मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Kondhwa MD Drugs | कोंढव्यातून तब्बल १४ लाखांचा एमडी जप्त

गुन्हे शाखा, अंमली पदार्थ विरोधी पथक - २ कडून कारवाई

M
mubarak

2 मिनिट वाचन

kondhwa md drugs seized by anc 2

  • गुन्हे शाखा, अंमली पदार्थ विरोधी पथक - २ कडून कारवाई
  • पुणे, दि. २७ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर
    मुबारक जिनेरी

    Kondhwa MD Drugs | पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या ड्रग्स फ्री पुणे संकल्पनेसाठी पुणे गुन्हे शाखा पोलिसांनी व्यापक कारवाया हाती घेतल्या आहेत. आज एका कारवाईत गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढवा येथे वास्तव्यास असणाऱ्या दोन ड्रग्स तस्करांना बेड्या ठोकून तब्बल १४ लाख रुपयांचा एमडी जप्त केला आहे. सदर कारवाई पोलीस उप-आयुक्त, गुन्हे निखिल पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड Police Inspector Sudarshan Gaykwad व पथकाने केली आहे.

    याप्रकरणी संशयित जहीर ऊर्फ साद गनी खान, वय २० वर्षे व आदनान शाबीर शेख, वय २५ वर्षे, दोन्ही रा. कोंढवा, यांना ताब्यात घेण्यात आले आहे. Kondhwa MD Drugs

    आज दि.२७ रोजी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड तसेच पथक पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार अझिम शेख यांना मिळालेले बातमीनुसार ११/३५ चा ओपेल फलक सोसायटी समोर, मलीक नगर, कोंढवा, पुणे येथील सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी इसम नामे १) जहीर ऊर्फ साद गनी खान, वय २० वर्षे, २) आदनान शाबीर शेख, वय २५ वर्षे, दोन्ही रा. कोंढवा, पुणे यांच्या ताब्यातुन एकुण १४,००,०००/- रु. कि.चा ६३ ग्रॅम मॅफेड्रोन (एम.डी) हा अंमली पदार्थ व इतर ऐवज जप्त करण्यात आला आहे.

    वरील नमुद कारवाई ही Pune Police पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, रजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उप-निरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार अझिम शेख, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव, दिशा खेवलकर, साहिल शेख, संदिप शेळके, योगेश मांढरे, अझिम शेख, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, आझाद पाटील यांनी केली आहे.

    हेही वाचा: Kondhwa Crime News | एकाचवेळी चोरीच्या तब्बल २० दुचाकी हस्तगत : कोंढवा पोलिसांची दमदार कामगिरी

    शेअर करा