मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Kohlapur News : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात महिलांमध्ये हाणामारी ; काकड आरतीवेळी बसण्याच्या कारणावरून वाद

Kohlapur News :कोल्हापूर: शारदीय नवरात्रोत्सव सुरू असतानाच करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात काकड आरतीवेळी महिला भाविक आणि श्रीपूजकांकडील मदतनीस महिला यांच्यात वाद होऊन मारामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात महिलांमध्ये हाणामारी काकड आरतीवेळी बसण्याच्या कारणावरून वाद
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात महिलांमध्ये हाणामारी काकड आरतीवेळी बसण्याच्या कारणावरून वाद

Kohlapur News :कोल्हापूर: शारदीय नवरात्रोत्सव सुरू असतानाच करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात काकड आरतीवेळी महिला भाविक आणि श्रीपूजकांकडील मदतनीस महिला यांच्यात वाद होऊन मारामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाची चर्चा सुरू झाली. याप्रकरणी सायली मोहन भोसले यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात प्रिया योगेश जोशी यांच्याविरोधात मारहाणीची तक्रार दिल्याचे ताज्या वृत्तात म्हटले आहे.https://maharashtramirror.com/ Kohlapur News
शुक्रवारी पहाटे काकड आरतीसाठी काही स्थानिक महिला मंदिरात आल्या होत्या. बसण्याच्या जागेवरून त्यांचा मदतनीस महिलेशी वाद झाला. सुरुवातीच्या शाब्दिक वादाचे पुढे धक्काबुक्की आणि मारामारीत रूपांतर झाले. ही घटना मंदिर परिसरातील गणेश मंदिर चौकात घडल्याचे वृत्त आहे.
‘संबंधित महिला पुजाऱ्याची पत्नी नाही’
व्हायरल व्हिडिओमध्ये मारहाण करणाऱ्या महिलेचा उल्लेख ‘पुजाऱ्याची पत्नी’ असा करण्यात आल्याने श्रीपूजक अजित ठाणेकर यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. संबंधित महिला पुजारी कुटुंबातील नसून मदतनीस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मंदिरातील संवेदनशील चित्रीकरण बाहेर कसे गेले, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरात मोठी गर्दी होत असतानाच हा प्रकार घडला आहे. मंदिरातील व्यवस्थापनावरून यापूर्वीही श्रीपूजक आणि प्रशासनात वाद झाला होता.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा