मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

KDMC News : कल्याण-डोंबिवलीत मतदानापूर्वीच महायुतीचा गुलाल! 9 नगरसेवक बिनविरोध; सत्तेच्या आकड्यापासून अवघ्या 53 पावले दूर

KDMC News : रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदेंची रणनीती यशस्वी; भाजपचे 5 तर शिंदे गटाचे 4 उमेदवार विजयी

V
Vivek

1 मिनिट वाचन

KDMC News : कल्याण-डोंबिवलीत मतदानापूर्वीच महायुतीचा गुलाल! 9 नगरसेवक बिनविरोध; सत्तेच्या आकड्यापासून अवघ्या 53 पावले दूर

KDMC News : रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदेंची रणनीती यशस्वी; भाजपचे 5 तर शिंदे गटाचे 4 उमेदवार विजयी

कल्याण | राज्यातील महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत कल्याण-डोंबिवलीतून (KDMC) महायुतीसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर आणि अर्जांच्या छाननीनंतर महायुतीचे एकूण 9 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये भाजपचे 5 आणि शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे 4 उमेदवारांचा समावेश आहे. 122 सदस्यसंख्या असलेल्या केडीएमसीमध्ये बहुमतासाठी 62 जागांची आवश्यकता आहे, ज्यातील 9 जागा महायुतीने आधीच खिशात टाकल्या आहेत.

भाजपची 'विजयाची पंचक'
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने 5 जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे.

बिनविरोध विजयी उमेदवार

रेखा राजन चौधरी (प्रभाग 18 अ)

आसावरी केदार नवरे (प्रभाग 26 क)

रंजना मितेश पेणकर (प्रभाग 26 ब)

मंदा पाटील

ज्योती पवन पाटील (प्रभाग 24 ब)

शिवसेना शिंदे गटाचे 'चौकार'

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची राजकीय खेळी येथे यशस्वी ठरल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

बिनविरोध विजयी उमेदवार

रमेश म्हात्रे (पॅनल 24)

विश्वनाथ राणे (पॅनल 24)

वृषाली रणजित जोशी (पॅनल 24)

हर्षल राजेश मोरे (प्रभाग 28 अ) - हे आमदार राजेश मोरे यांचे चिरंजीव आहेत.

राज्यातील महायुतीची एकूण स्थिती
केवळ कल्याण-डोंबिवलीच नव्हे, तर राज्यभरात महायुतीची घोडदौड सुरू आहे. आतापर्यंत राज्यात महायुतीचे एकूण 13 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत:

भाजप (8 जागा): केडीएमसी (5), धुळे (2), पनवेल (1).

शिवसेना शिंदे गट (5 जागा): केडीएमसी (4), जळगाव (1).

राष्ट्रवादी अजित पवार गट (1 जागा): अहिल्यानगर (1 - कुमार वाकळे).

शेअर करा