मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Karad News : 'दादां'च्या निधनानंतर वहिनींचा पहिला दौरा; कराडमध्ये यशवंतरावांना अभिवादन, तर फलटणमध्ये 'त्या' कुटुंबाचे अश्रू पुसणार

•उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार साताऱ्यात; विमान अपघातात प्राण गमावलेल्या विदीप जाधवांच्या निवासस्थानी देणार भेट

V
Vivek

1 मिनिट वाचन

Baramati Lok Sabha Election : कन्हेरीच्या मारोती मंदिरात नाराळ फोडत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला सुरुवात

•उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार साताऱ्यात; विमान अपघातात प्राण गमावलेल्या विदीप जाधवांच्या निवासस्थानी देणार भेट

सातारा/कराड | उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आज आपल्या सार्वजनिक कामाला सुरुवात केली आहे. अजितदादा ज्यांना आपले राजकीय दैवत मानायचे, त्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक होऊन सुनेत्रा पवार यांनी आपल्या नव्या इनिंगचा श्रीगणेशा केला. मात्र, या दौऱ्यात राजशिष्टाचारापेक्षाही 'माणुसकी' आणि 'सांत्वन' याला अधिक महत्त्व असल्याचे दिसून येत आहे.

यशवंतरावांच्या विचारांचा वसा पुढे नेणार

सकाळी 10 वाजता कराड येथील प्रीतीसंगम बागेत सुनेत्रा पवार यांचे आगमन झाले. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. अजितदादांच्या राजकीय प्रवासात हे स्थळ नेहमीच ऊर्जा देणारे राहिले होते. तोच वारसा पुढे चालवण्याचा संदेश सुनेत्रा वहिनींनी या भेटीतून दिला आहे.
विदीप जाधव यांच्या कुटुंबाचे सांत्वन
कराडमधील दर्शनानंतर सुनेत्रा पवार फलटणकडे रवाना झाल्या आहेत. दुपारी १ वाजता त्या अजितदादांचे निष्ठावान अंगरक्षक (PSO) विदीप जाधव यांच्या तरडगाव (ता. फलटण) येथील निवासस्थानी भेट देणार आहेत.

दुर्दैवी अपघात: 28 जानेवारी रोजी बारामतीत झालेल्या विमान अपघातात अजितदादांसोबत विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला होता.
कर्तव्यदक्ष अंगरक्षक: विदीप जाधव हे 2019 पासून अजितदादांसोबत सावलीसारखे असायचे. 29 जानेवारी रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी विदीप यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. आता सुनेत्रा पवार स्वतः या कुटुंबाचे अश्रू पुसण्यासाठी त्यांच्या घरी जात आहेत.

अपघातातील इतर मृतांच्या आठवणी
बारामती विमान अपघातात अजितदादा आणि विदीप जाधव यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर, को-पायलट शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या कुटुंबांनाही आधार देण्याचे काम सरकार आणि पवार कुटुंबाकडून केले जात आहे.

शेअर करा