मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Kalyan News : कल्याण-डोंबिवलीत राजकीय भूकंप! मनसेच्या 'या' बड्या दाम्पत्याचा राजीनामा; तर काँग्रेसला खिंडार

Kalyan MNS News : कौस्तुभ आणि कस्तुरी देसाईंनी सोडली 'राज ठाकरे' यांची साथ; माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिंदेंच्या वाटेवर?

V
Vivek

1 मिनिट वाचन

MNS Vardhapan Din

Kalyan MNS News : कौस्तुभ आणि कस्तुरी देसाईंनी सोडली 'राज ठाकरे' यांची साथ; माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिंदेंच्या वाटेवर?

कल्याण | राज्याच्या राजकारणात सध्या कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्र (KDMC) राजकीय 'हॉटस्पॉट' ठरले आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शहरात पक्षांतराचे मोठे वारे वाहू लागले असून, एकाच वेळी मनसे आणि काँग्रेसला मोठे धक्के बसले आहेत. मनसेचे दोन प्रमुख चेहरे कौस्तुभ देसाई आणि माजी नगरसेविका कस्तुरी देसाई यांनी पक्षाला 'जय महाराष्ट्र' केल्याने मनसेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

छायाचित्रे · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶

मनसेला 'देसाई' दाम्पत्याचा धक्का

कल्याण पश्चिमेत मनसेची ताकद मानले जाणारे माजी शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कस्तुरी देसाई यांनी आपल्या सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे, कौस्तुभ देसाई यांचे बंधू कल्पेश देसाई यांनी काही दिवसांपूर्वीच 'ठाकरे गटात' प्रवेश केला होता. त्यामुळे आता हे दाम्पत्य देखील मशाल हाती घेणार की धनुष्यबाण? याबाबत चर्चांना उधाण आले आहे."राजीनामा दिला आहे हे खरं असलं, तरी पुढील राजकीय प्रवासाचा निर्णय अद्याप घेतलेला नाही," अशी सावध प्रतिक्रिया कौस्तुभ देसाई यांनी दिली आहे.

काँग्रेसलाही मोठे खिंडार

दुसरीकडे, कल्याणमध्ये काँग्रेसलाही मोठे भगदाड पडणार असल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे हे आपल्या समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. पोटे यांच्या जाण्यामुळे कल्याणमधील काँग्रेसची संघटनात्मक बांधणी खिळखिळी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शेअर करा