मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Kalyan Drug Connection : कल्याण स्थानकात ‘ड्रग्ज कनेक्शन’ उघड! प्रवाशाच्या पिशवीतून उघड झाला 8 किलो गांजाचा स्फोट

Kalyan - Gujrat Drug Connection Racket Busted : गुजरातहून आलेला ‘तस्कर’ अटकेत; लाखो रुपयांच्या गांजाची तस्करी उधळली

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane Crime News

Kalyan - Gujrat Drug Connection Racket Busted : गुजरातहून आलेला ‘तस्कर’ अटकेत; लाखो रुपयांच्या गांजाची तस्करी उधळली

कल्याण :- कल्याण रेल्वे Kalyan Railway Station स्थानकावर सोमवारी दुपारी एक मोठी घडामोड घडली. फलाट क्रमांक सातवर संशयास्पदपणे फिरणाऱ्या एका प्रवाशावर सुरक्षा जवानांनी लक्ष केंद्रित करत तपासणी केली असता, त्याच्या पिशवीतून तब्बल 8 किलो 300 ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ सापडला. Kalyan - Gujrat Drug Connection Racket Busted

फलाटावर संशयास्पद हालचाली; सुरक्षा जवानांच्या सतर्कतेमुळे अंमली पदार्थ सापडले

सदर प्रवाशाचे नाव नरेशकुमार मनोहरभाई पंचोली (34 वय, राहणार – गुजरात) असे असून, तो कोणतीही ट्रेन न पकडता प्लॅटफॉर्मवर रेंगाळत असल्याने जवानांना संशय आला. पोलिसांच्या चौकशीत तो गोंधळला आणि तपासणीदरम्यान त्याच्याकडील पिशवीतून गांजाचा मोठा साठा उघड झाला.

कल्याण रेल्वे स्थानकातून देशभर गाड्या सुटत असल्याने तस्करीसाठी ही जागा निवडली गेल्याची शक्यता आहे. या कारवाईत लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाने संयुक्तपणे मोठा साखळी खोडून काढल्याचे मानले जात आहे.

ही धाडसी कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.

शेअर करा