मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

kalyan crime news : कल्याणमध्ये तणाव, दोन गटांत तुंबड हाणामारी, पाच जखमी

Kalyan Crime News : कल्याणमध्ये दोन गटांत तुंबड हाणामारी झाली.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Kalyan Crime News

Kalyan Crime News : कल्याणमध्ये दोन गटांत तुंबड हाणामारी झाली. त्यात पाच जण जखमी झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी 40 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

कल्याण : दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात सुरु असताना कल्याण पूर्वेमध्ये दोन गटात तुफान राडा झाला. कल्याण पूर्वेतील कचोरे गावात फटाक्याच्या किरकोळ वादावरून हाणामारी झाली. दोन्ही गटांकडून भर रस्त्यात झालेल्या तुंबळ हाणामारीत पाच जण जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. टिळक नगर पोलिसांनी दोन्ही गटाच्या 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल केला. त्यातील सहा जणांना ताब्यात घेतले आहे.राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्यातच दिवाळी सणही आला आहे. यामुळे पोलिसांकडून सर्वत्र कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सांभाळण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा केली जात आहे. परंतु कल्याणपूर्व भागात फटके फोडण्यावरुन वाद झाला. त्या वादाचे रुपातंर हाणामारीत झाले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचत परिस्थितीवर नियंत्रण आणले. सध्या कल्यामधील कचोरे गावात तणावपूर्ण शांतता आहे. सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

नेमक‌ काय घडली घटना?

कल्याण पूर्व येथील कचोरे गावात गुरुवारी रात्रीच्या सुमारास फटाक्यावरुन दोन गटात वाद निर्माण झाला. त्यावेळी काही काळ बाचावाची झाली. त्यानंतर दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. या वादात भर चौकात तुंबळ हाणामारी झाली. ज्यात पाच जण जखमी झाले आहेत. हाणामारीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच टिळक नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही गटातील 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल केला. यामध्ये सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या पोलिसांनी या परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

शेअर करा