मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

कळंब पोलीस स्टेशन हद्दीतील तीन सराईत गुन्हेगार यांना हद्दपार

कळंब (प्रतिनिधी) दि.०३/०४/२०२४ रोजी धाराशिव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी कळंब पोलीस स्टेशन हद्दीतील तीन सराईत गुन्हेगार यांना हद्दपार केले सविस्तर वृत्त असे की कळंब पोलीस स्टेशन हद्दीत इसम नामे 01) अतुल आबासाहेब कोल्हे रा.हावरगाव ता.

DM
Deepak Mali

1 मिनिट वाचन

कळंब पोलीस स्टेशन हद्दीतील तीन सराईत गुन्हेगार यांना हद्दपार

कळंब (प्रतिनिधी) दि.०३/०४/२०२४ रोजी धाराशिव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी कळंब पोलीस स्टेशन हद्दीतील तीन सराईत गुन्हेगार यांना हद्दपार केले
सविस्तर वृत्त असे की कळंब पोलीस स्टेशन हद्दीत इसम नामे
01) अतुल आबासाहेब कोल्हे रा.हावरगाव ता. कळंब
02) शिवराज रामहरी लोकरे रा खेर्डा ता. कळंब
03) उमेश महादेव लोकरे रे. खेर्डा ता. कळंब
यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन कळंब येथे विविध कलमानुसार गुन्हे दाखल असल्याने आगामी लोकसभा निवडणूक संबंधाने कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या करीता त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 प्रमाणे हद्दपारी करीता मा. SDM साहेब कळंब यांचेकडे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यावर सुनावणी होवुन त्यांना प्रत्येकी 03 महिन्यापर्यंत धाराशिव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
सदरील कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक श्री गौहर हसन, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री संजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवि सानप, सहा. पोलीस निरीक्षक हनुमंत कांबळे, पोलीस उप निरीक्षक रामहरी चाटे, पोहेकाॅ प्रशांत सोनटक्के, परमेश्वर जाधव, पोना शिवाजी राऊत  यांनी केली आहे.

शेअर करा