मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

कळंब मध्ये दोघांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

NCMC कार्ड गैरव्यवहार प्रकरणात बातमी लावल्याचा राग

DM
Deepak Mali

1 मिनिट वाचन

कळंब मध्ये दोघांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

NCMC कार्ड गैरव्यवहार प्रकरणात बातमी लावल्याचा राग

कळंब(प्रतिनिधी) येथील पत्रकार संदिप कोकाटे यांना बातमी डिलीट करण्यासाठी दबाव टाकत धमकावणाऱ्या दोघांविरुद्ध बी. एन.एस व महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था ( हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियमाखाली शनिवार (ता. 04 ) रोजी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

राज्यभरात सुरु असलेल्या NCMC म्हणजेच राष्ट्रीय सामान्य गतीशिलता कार्ड मध्ये मोठा गैरव्यवहार होत असल्याच्या घटना सुरु आहेत असाच प्रकार कळंब येथील आगारात सुरु होता येथे NCMC कार्ड काढण्यासाठी नागरिकांकडून शासनाने निश्चित केलेल्या शुल्का व्यतिरिक्त अधिकची रक्कम एजंट कडून वसुलली जात होती. या प्रकाराबाबत पत्रकार संदिप कोकाटे यांनी नमस्ते धाराशिव च्या समाजमाध्यमातून बातमी प्रसिद्ध केल्यानंतर सातत्याने संबंधित एजंट च्या आय डी वर सब एजंट म्हणून काम पाहणाऱ्या संगमेश मेनकुदळे व धीरज उर्फ लाला मालपाणी या दोघांकडून बातमी डिलीट करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आधी भावनिक नंतर आमिष दाखविण्यात आले मात्र पत्रकार संदिप कोकाटे यांनी या कोणत्याच गोष्टीला बळी न पडता याबाबत प्रशासन आणि याबाबतीतील आवाज उठवत राहिल्यानंतर त्यांना या दोघांनी गुरुवार (ता.02) रोजी रात्रीच्या 11 वाजता त्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी जात धमक्या दिल्या व नंतर ही भेटण्याचा आग्रह करत पुन्हा चौकात बातमी डिलीट कर नाहीतर बघून घेण्याच्या आणि खोट्या गुन्हात अडकविण्याची व पैसे मागितले असल्याची बदनामी करण्याची दबाव टाकत धमकी दिल्याने पत्रकार संदिप कोकाटे यांना बातम्या डिलीट करण्यासाठी धमकविल्या प्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात संगमेश मेनकुदळे व धीरज उर्फ लाला मालपाणी या दोघांविरुद्ध बी. एन.एस चे कलम 351(2),3(5) व महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था ( हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम चे 3 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेअर करा