मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

"केवळ हिंदू-मुस्लीम द्वेष पसरवणे हा जर पंतप्रधानांचा….. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट

Jitendra Awhad Target PM Modi Doing Tweet : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत मुस्लिम समाजाबद्दल एक विधान केले,आव्हाड यांचे ट्विट

V
Vivek

2 मिनिट वाचन

Jitendra Awhad

Jitendra Awhad Target PM Modi Doing Tweet : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत मुस्लिम समाजाबद्दल एक विधान केले,आव्हाड यांचे ट्विट

मुंबई :- देशाला सांगण्यासारखे काहीच नसते तेव्हा भाषणात आपल्या कामांबद्दल न बोलता केवळ हिंदू-मुस्लीम Hindu Muslim द्वेष पसरवणे हा जर पंतप्रधानांचा उद्देश असेल तर हे या देशाचे दुर्दैवं आहे अशी संतप्त प्रतिक्रिया शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांनी सभेत मुस्लिम समाजाबद्दल एक विधान केले होते. यावरूनच आव्हाड यांनी ट्विट केले आहे. Jitendra Awhad Latest Tweet

ट्विटमध्ये आव्हाडांनी म्हंटले आहे

"आज देशाच्या पंतप्रधानांनी केलेले भाषण हे पदाला शोभणारे नक्कीच नव्हते. भाषणात मुस्लिम समाजाकडे बोट दाखवताना "घुसपेठीया" या शब्दाचा त्यांनी प्रयोग केला. जे विधान काँग्रेसकडून कधी केले नव्हते. ते काँग्रेसच्या नावावर ढकलून, राष्ट्राची संपत्ती मुस्लिमांना वाटणार होते, असे सांगून टाकले. हे सर्व करताना त्यांना कुठला आनंद किंवा कुठले सुख मिळते, हेच कळत नाही", असे आव्हाड म्हणाले. Jitendra Awhad Latest Tweet

त्यांना द्वेष पसरवण्याशिवाय पर्यायच नाही पुढे आव्हाड म्हणाले, "जेव्हा देशाला सांगण्यासारखे काहीच नसते; तेव्हा आपल्या कामांबद्दल न बोलता केवळ हिंदू-मुस्लीम द्वेष पसरविणे हा जर पंतप्रधानांचा उद्देश असेल तर हे या देशाचे दुर्दैवं आहे. एवढं सगळं बोलल्यानंतरही निवडणूक आयोगाला जाग येईल, असे काही वाटत नाही. पण, देशातील निवडणुका आता फक्त द्वेष या एकाच विषयावर लढविल्या जाणार आहेत. कारण की, निवडणुकांमध्ये बदललेली परिस्थिती आणि त्यामुळे सरकलेली पायाखालची वाळू याकडे पाहता त्यांना द्वेष पसरविण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाही", अशी टीका आव्हाडांनी केली आहे. Jitendra Awhad Latest Tweet

पंतप्रधान मोदी यांचे विधान काय?

दरम्यान, "पूर्वी जेव्हा त्यांचं सरकार होतं, तेव्हा ते म्हणाले होते की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. संपत्ती एकत्र करून हे कोणाला वाटणार? याचा अर्थ ज्यांना जास्त मुलं आहेत त्यांना ही संपत्ती वाटणार. घुसपेठियांना वाटणार. तुमच्या मेहनतीच्या कमाईचा पैसा घुसपेठियांना दिला पाहिजे हे तुम्हाला मंजूर आहे का? हा शहरी नक्षलवादाचा विचार आपल्या महिलांकडचं मंगळसूत्रही वाचू देणार नाहीत", असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेत म्हणाले होते. सध्या मोदींच्या या विरोधनावर विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

शेअर करा