मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Jalgaon Robbery Case : एकनाथ खडसेंच्या घरात जबरी चोरी; 'भ्रष्टाचाराच्या सीडी आणि कागदपत्रे चोरण्याचा उद्देश' - खडसेंचा गंभीर आरोप

Eknath Khadse Home Robbery News : सात-आठ तोळे सोने आणि रोख रक्कम लंपास; राजकीय विरोधकांकडे बोट?

V
Vivek

1 मिनिट वाचन

Jalgaon Robbery Case : एकनाथ खडसेंच्या घरात जबरी चोरी; 'भ्रष्टाचाराच्या सीडी आणि कागदपत्रे चोरण्याचा उद्देश' - खडसेंचा गंभीर आरोप

Eknath Khadse Home Robbery News : सात-आठ तोळे सोने आणि रोख रक्कम लंपास; राजकीय विरोधकांकडे बोट?

जळगाव :- राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगाव शहरातील शिवराम नगरमधील निवासस्थानी मध्यरात्रीच्या सुमारास जबरी चोरीची घटना घडली आहे. या चोरीत चोरट्यांनी सात ते आठ तोळे सोने आणि 35 हजार रुपये रोख रक्कम लंपास केल्याचे समोर आले आहे. या घटनेचे एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, चोरट्यांनी केवळ एका तासात हातसफाई केल्याचे दिसून आले. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

चोरीच्या घटनेनंतर आज (29 ऑक्टोबर 2025) एकनाथ खडसे जळगावमध्ये दाखल झाले. त्यांनी घरात काय-काय चोरीला गेले याचा आढावा घेतला आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले.

'चोरट्यांचा उद्देश कागदपत्रे चोरणे'

एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ही चोरी 'भुरट्या चोरांचे काम नाही' असे सांगत, यामागे मोठा कट असल्याचा संतोवाच केला. त्यांनी थेट राजकीय विरोधकांकडे बोट दर्शवत गंभीर आरोप केला.

खडसेंचा आरोप: "चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रेकी करून माझ्या घरातली भ्रष्टाचारा संदर्भातली महत्त्वाची कागदपत्रे तसेच महत्त्वाच्या सीडी (CDs), आणि पेन ड्राईव्ह चोरून नेण्यासाठीच ही चोरी केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला."

चोरी गेलेला ऐवज: चोरट्यांनी दहा सीडीज आणि घरातले सर्व 25 ते 30 पेन ड्राईव्ह चोरून नेल्याचा दावा खडसे यांनी केला.

उद्देशावर प्रश्न: "चोरट्यांचा केवळ चोरी करणे हा उद्देश नव्हता, तर माझ्या घरातली कागदपत्रे, पेन ड्राईव्ह, सीडी चोरून नेण्याच्याच उद्देशाने ही चोरी झाली," असे खडसे म्हणाले.

सध्या मी कोणाचेही नाव घेऊ शकत नाही किंवा आक्षेप घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, उर्वरित शिल्लक राहिलेल्या सीडीज आणि कागदपत्रे पोलिसांना दाखवून त्या दृष्टीने तपास करण्याची विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांकडून तपास सुरू

काल पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी सुमारे 868 ग्रॅम सोनं आणि 35 हजार रुपये रोख असा मुद्देमाल चोरला आहे. सध्या घटनास्थळी श्वानपथक तसेच ठसे तज्ज्ञांकडून तपासणी केली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे आणि पोलीस ठाण्याचे स्वतंत्र पथक चोरट्यांच्या शोधार्थ रवाना करण्यात आले आहे.

शेअर करा