मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

IPL 2025 : RCBचा विजयगर्जा! ऐतिहासिक रनचेसने लखनौवर मात करत क्वालिफायरमध्ये धडक

• जितेश शर्माची 85 धावांची तुफानी खेळी, RCBचा 227 धावांचा विक्रमी पाठलाग यशस्वी

V
Vivek

1 मिनिट वाचन

IPL 2025 : RCBचा विजयगर्जा! ऐतिहासिक रनचेसने लखनौवर मात करत क्वालिफायरमध्ये धडक

•जितेश शर्माची 85 धावांची तुफानी खेळी, RCBचा 227 धावांचा विक्रमी पाठलाग यशस्वी

IPL2025 :- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या सर्वात रोमांचक सामन्यांपैकी एक खेळत लखनौ सुपर जायंट्सचा 6 विकेट्सने पराभव करत क्वालिफायर 1 मध्ये आपले स्थान निश्चित केले. या विजयाने केवळ प्लेऑफमध्ये त्यांची वाटचाल पक्की केली नाही, तर त्यांनी संघाच्या इतिहासातील सर्वात मोठं लक्ष्य पार करण्याचा पराक्रम देखील केला.

227 धावांचे लक्ष्य पार करताना RCBने आक्रमक सुरुवात केली. विराट कोहली आणि फिल सॉल्टने अवघ्या 5 षटकांत 60 धावांची भागीदारी केली. सॉल्टने 30 धावा केल्या, तर विराट कोहलीने 10 चौकारांसह 54 धावांची शानदार खेळी केली. रजत पाटीदार झटपट बाद झाल्यावर मैदानात उतरले मयंक अग्रवाल आणि जितेश शर्मा.

या दोघांनी लखनौच्या गोलंदाजीवर धावांचा वर्षाव करत सामना RCBच्या बाजूने वळवला. मयंकने 41 धावांची संयमी पण महत्त्वाची खेळी केली, तर जितेश शर्माने अवघ्या 33 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकार ठोकत 86 धावांची झंझावाती खेळी साकारली. या खेळीमुळे RCBने अवघ्या 8 चेंडू शिल्लक ठेवत हा थरारक सामना जिंकला.

हा विजय केवळ एक सामना जिंकण्यापुरता मर्यादित नाही. RCBने यासह आयपीएलमध्ये घरच्या मैदानाबाहेर सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रमही केला आहे. आता ते प्लेऑफमध्ये पंजाब किंग्सविरुद्ध पहिला क्वालिफायर सामना खेळणार असून अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी त्यांच्याकडे दोन संधी आहेत.

हेही वाचा: स्वातंत्र्यवीर सावरकर : क्रांती, विचार आणि राष्ट्रनिर्माणाचा अटळ दीपस्तंभ

शेअर करा