मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

MI Vs GT IPL 2025 : गुजरात विरुद्ध मुंबई एलिमिनेटर सामना आज थरारक ठरण्याची शक्यता

शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या आमनेसामने; पराभूत संघ IPL बाहेर होणार

V
Vivek

1 मिनिट वाचन

MI Vs GT IPL 2025 : गुजरात विरुद्ध मुंबई एलिमिनेटर सामना आज थरारक ठरण्याची शक्यता

शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या आमनेसामने; पराभूत संघ IPL बाहेर होणार

विजयी संघ थेट क्वालिफायर-2 मध्ये पंजाब किंग्सशी भिडणार

IPL 2025 :- इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चुरशीची लढत रंगणार आहे. हा सामना मुल्लांपूरच्या महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. गुजरातची धुरा युवा कर्णधार शुभमन गिलकडे असणार आहे, तर मुंबईच्या संघाचं नेतृत्त्व हार्दिक पंड्या करणार आहे.

या सामन्याचे महत्त्व अधिक असल्याचे कारण म्हणजे पराभूत संघ थेट स्पर्धेबाहेर जाणार आहे, तर विजयी संघ 1 जून रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या क्वालिफायर-2 मध्ये पंजाब किंग्सशी सामना करणार आहे. त्यामुळे आजचा सामना "करो या मरो" असा ठरणार आहे.

गुजरात टायटन्सने आतापर्यंत मुंबई इंडियन्सविरुद्ध IPL मध्ये 7 सामन्यांत 5 विजय मिळवले आहेत. यंदाच्या हंगामात देखील त्यांनी दोन्ही सामन्यांत मुंबईचा पराभव केला आहे. त्यामुळे गुजरातचा आत्मविश्वास उंचावलेला असला, तरी प्लेऑफचा दबाव आणि मुंबईचा अनुभव सामन्याला रंगत आणणार आहे.

गुजरात टायटन्सची संभाव्य संघरचना : साई सुदर्शन, शुभमन गिल, कुसल मेंडिस (वि.), शेरफेन रदरफोर्ड, राहुल तेवतिया, शाहरुख खान, राशिद खान, आर. साई किशोर, गेराल्ड कोएट्जी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

मुंबई इंडियन्सची संभाव्य संघरचना : जॉनी बेयरस्टो (वि.), रोहित शर्मा, चरिथ असलंका, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, नमन धीर, मिचेल सेंटनर, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.

हेही वाचा: Thane Crime News : हरियाणा-दिल्लीतून अवैध स्कॉच मद्याचा 18 लाखांचा साठा सापडला; तीन जणांना पोलिसांनी पकडलं

शेअर करा