मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

India vs New Zealand Highlights : बेंगळुरूमध्ये भारत पराभवाच्या उंबरठ्यावर , न्यूझीलंडला विजयासाठी फक्त 107 धावांची गरज आहे

India vs New Zealand Highlights, 1st Test, Day 4 : बंगळुरू कसोटीत भारताने न्यूझीलंडसमोर 107 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

India vs New Zealand Highlights : बेंगळुरूमध्ये भारत पराभवाच्या उंबरठ्यावर , न्यूझीलंडला विजयासाठी फक्त 107 धावांची गरज आहे

India vs New Zealand Highlights, 1st Test, Day 4 : बंगळुरू कसोटीत भारताने न्यूझीलंडसमोर 107 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. खराब प्रकाशामुळे दिवसाचा खेळ वेळेपूर्वीच संपला.

BCCI :- भारत विरुद्ध न्यूझीलंड India vs New Zealand यांच्यातील बंगळुरू येथे खेळला जाणारा पहिला कसोटी सामना रोमांचक वळणावर पोहोचला आहे. खराब प्रकाश आणि मुसळधार पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ वेळेपूर्वीच संपला. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने केवळ 4 चेंडू खेळले, ज्यामध्ये संघाला आपले खातेही उघडता आले नाही. न्यूझीलंडला सामना जिंकण्यासाठी 107 धावा करायच्या आहेत. India vs New Zealand Highlights

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 3 गड्यांच्या मोबदल्यात 231 धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी सकाळी टीम इंडियाने आपला स्कोअरबोर्ड पुढे सरकवला. सर्फराज खान आणि ऋषभ पंत यांच्यात १७७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाल्याने चौथ्या दिवसाची पहिली दोन सत्रे भारताच्या नावावर होती. सर्फराजने 150 धावा केल्या, तर ऋषभ पंत 99 धावा करून बाद झाला.मात्र यानंतर टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. India vs New Zealand Highlights

भारताने 3 गडी गमावून 408 धावा केल्या होत्या. मात्र सर्फराज खानची विकेट पडल्यानंतर टीम इंडियाची बॅटिंग स्ट्रगल मोडमध्ये गेली. परिस्थिती अशी होती की भारताने शेवटच्या 7 विकेट केवळ 54 धावांत गमावल्या.चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात केएल राहुलला मॅट हेन्री आणि विल्यम ओरूर्केच्या घातक गोलंदाजीसमोर केवळ 12 धावा करता आल्या, तर रवींद्र जडेजालाही केवळ 5 धावा करता आल्या. अशाप्रकारे टीम इंडियाचा दुसरा डाव 462 धावांवर आटोपला.

हेही वाचा: Panvel Crime News : सायबर चोरट्यांचा धुमाकूळ! सोशल मीडिया टिंडर ॲप वरून महिलेची फसवणूक

शेअर करा