मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Crime News : ठाण्यात लाचखोर लिपिकाला थेट जेलची वाट – १ वर्ष सश्रम कारावास ठोठावला!

ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचातील तत्कालीन कनिष्ठ लिपिक किशोर विश्वनाथ मानकामे (वय ६४, सध्या निवृत्त) हा फाईल दाखल करण्यासाठी लाच घेताना रंगेहात पकडला गेला.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane Crime News : ठाण्यात लाचखोर लिपिकाला थेट जेलची वाट – १ वर्ष सश्रम कारावास ठोठावला!

ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचातील तत्कालीन कनिष्ठ लिपिक किशोर विश्वनाथ मानकामे (वय ६४, सध्या निवृत्त) हा फाईल दाखल करण्यासाठी लाच घेताना रंगेहात पकडला गेला. नागरिकांच्या हक्कांवर डल्ला मारणाऱ्या या लाचखोराला मा. विशेष सत्र न्यायालय, ठाणे यांनी तब्बल १ वर्ष सश्रम कारावास व दंड ठोकला.

प्रकरण काय?

"फाईल दाखल करायची असेल तर २०० रुपये द्यावे लागतील," असे बिनधास्त सांगत मानकामे याने ५ फाईल्ससाठी तब्बल १००० रुपयांची लाच मागितली.
तक्रार मिळताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मानकामे याला पकडले.
आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल.

शिक्षेचा निकाल :
कलम ७ अंतर्गत – १ वर्ष सश्रम कारावास + १००० रुपये दंड (न भरल्यास १ महिना साधा कारावास)
कलम १३(१)(ड) सह १३(२) अंतर्गत – १ वर्ष सश्रम कारावास + १००० रुपये दंड (न भरल्यास १ महिना साधा कारावास)

तपास अधिकारी : पोलीस उपअधिकारी वाल्मिक पाटील
सरकारी अभियोक्ता : संजय मोरे

नागरिकांना आवाहन
"लाचखोरांविरोधात आवाज उठा!
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधा!
भ्रष्टाचार्यांचा पाडाव करणे हीच खरी सेवा!"

हेही वाचा: Anil Deshmukh : "माझ्यावर दगडफेक करून हल्लाच झाला!" फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे अनिल देशमुखांचे फडणवीस आणि सरकारवर थेट आरोप

शेअर करा