मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ghatkopar Skywalk News : स्कायवॉकवर अनोळखी मृतदेह… तपासात उघड झाला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू!

Mumbai Ghatkopar Skywalk Dead Body News : घाटकोपर स्थानकाजवळ गुरुवारी दुपारी आढळला मृतदेह; विलास राजे यांची ओळख उघड

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ghatkopar Skywalk News: Unidentified body found on the skywalk… Investigation reveals death of police officer!

Mumbai Ghatkopar Skywalk Dead Body News : घाटकोपर स्थानकाजवळ गुरुवारी दुपारी आढळला मृतदेह; विलास राजे यांची ओळख उघड

मुंबई | घाटकोपर रेल्वे स्थानक Ghatkopar Railway Station परिसरातील स्कायवॉकवर गुरुवारी दुपारी पंतनगर पोलिसांना एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. Mumbai Ghatkopar Skywalk Dead Body तपास सुरू होताच या मृतदेहाची ओळख विलास राजे (वय 54) या पोलीस कर्मचाऱ्याच्या रूपाने पटली. पंतनगर पोलीस ठाणे Pantnagar Police Station याप्रकरणाचा अधिक तपास करत आहे. Mumbai Latest Crime News

गुरुवारी दुपारी सुमारे 12 वाजता, स्कायवॉकवर एक इसम गंभीर अवस्थेत पडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन त्या व्यक्तीस घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं.

प्राथमिक तपासात मृत व्यक्ती 11 जूनपासून बेपत्ता असल्याचं निष्पन्न झालं. पुढील तपासात मृत इसमाची ओळख विलास राजे यांच्याप्रमाणे पटली, जे नायगाव येथील सशस्त्र पोलीस विभागात कार्यरत होते आणि घाटकोपरच्या जव्हार पोलीस लाईनमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, विलास राजे यांना गेल्या अनेक वर्षांपासून दारूचे व्यसन होते. यामुळे त्यांनी अनेक वेळा घर सोडले होते. प्राथमिक अंदाजानुसार, दारूच्या अतिसेवनामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे, असं पंतनगर पोलिसांनी सांगितलं.

शेअर करा