मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

'फिल्टरपाड्याचा बच्चन' चढला बोहल्यावर!

मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता गौरव मोरे याने गुपचूप साध्या पद्धतीने लग्न उरकले असून, त्याचे फोटो सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होत आहेत.

DJ
Dattatraya Jadhav

1 मिनिट वाचन

Gaurav More got married
Gaurav More got married

गौरव मोरेने उरकले गुपचूप लग्न

मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता गौरव मोरे  याने गुपचूप साध्या पद्धतीने लग्न उरकले असून, त्याचे फोटो सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होत आहेत. गौरवने स्वतः  त्याच्या लग्नाची कोणतीही अधिकृत घोषणा किंवा पोस्ट शेअर केलेली नाही. मात्र, त्याची मैत्रीण  अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने समाजमाध्यमावर गौरवच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने "Mr & Mrs मोरे" असे कॅप्शन दिले आहे.

ऋतुजाने  शेअर केलेल्या या फोटोत गौरव चंदेरी रंगाच्या कुर्त्यात तर त्याची पत्नी साडी, हातात हिरवा चुडा आणि गळ्यात मंगळसूत्र अशा पारंपरिक वेषात दिसत आहे. गौरवच्या पत्नीचे नाव प्रियांका कारेकर  असून, ती    मूळची मुंबईतील लालबाग-परळ परिसरातील राहणारी असून, ती स्वतः सुद्धा मनोरंजन विश्वाशी संबंधित आहे. प्रियांका उत्तम अभिनेत्री असून तिने अनेक प्रोजेक्ट्ससाठी काम केले आहे.  विशेष म्हणजे, तिने बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या 'चूप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट' या हिंदी चित्रपटात साऊथ सुपरस्टार दुलकर सलमान सोबत स्क्रीन शेअर केली होती. गौरव आणि प्रियांका गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.

Gaurav More got married

शेअर करा