मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Lonikalbhor Ganja | लोणीकाळभोर येथून तब्बल ८ लाखांचा गांजा जप्त : अंमली पदार्थ विरोधी पथक-२ कडून कारवाई

Lonikalbhor Ganja

M
mubarak

2 मिनिट वाचन

anti narcotics cell-2 arrested ganja accused lonikalbhor

Lonikalbhor Ganja

पुणे, दि. ११ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर
मुबारक जिनेरी

ड्रग्स मुक्त पुणे शहर करण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अंमली पदार्थ विरोधी मोहीम उघडली आहे. गेल्या ८ दिवसांपासून शहरातील विविध भागात कारवाई होत आहे. आज लोणीकाळभोर येथून तब्बल ८ लाखांचा जप्त करण्यात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-२ ला मोठे यश आले आहे. सदर कारवाई गुन्हे उपायुक्त निखिल पिंगळे, सपोआ राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक-२ वपोनि सुदर्शन गायकवाड व त्यांच्या पथकाने केली. Lonikalbhor Ganja

संशयित आरोपी १) सुमेर सादीक तांबोळी, वय २६ वर्षे, रा जयभवानी चौक, बुरडगल्ली, ता सांगोला, जि. सोलापुर, २) विकास बाळु बनसोडे, वय ३४ वर्षे, रा भिमनगर, सांगोला, सोलापुर यांना याप्रकरणी अटक करण्यात आली.

दि.१ रोजी येथील लोणी उरूळीकांचन रोडने शेल पेट्रोलपंप रोड लोणीकाळभोर पुणे येथे सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी इसम नामे १) सुमेर सादीक तांबोळी, वय २६ वर्षे, रा जयभवानी चौक, बुरडगल्ली, ता सांगोला, जि. सोलापुर, २) विकास बाळु बनसोडे, वय ३४ वर्षे, रा भिमनगर, सांगोला, सोलापुर यांच्या ताब्यात एकुण १६,१७,४००/- रु.कि.चा ऐवज त्यामध्ये ७,७७,४००/- रू.कि.चा. ३८ किलो ८७० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ, तसेच इतर ऎवज व अंमली पदार्थ संगणमताने, अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या, विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्याचे विरुध्द लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं.४४१/२०२४, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

वरील नमुद कारवाई ही Pune Police पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. २ राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार युवराज कांबळे, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, संदिप जाधव, साहिल शेख, अझिम शेख, आझाद पाटील व दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.

हेही वाचा: Pune Crime News | मोक्क्याच्या गुन्ह्यात दिड वर्षापासुंन फरार असणारा सराईत शशांक चव्हाण जेरबंद : चतुःश्रृंगी पोलीसांची कामगिरी

शेअर करा