मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

माजी उपसरपंच गोविंद बर्गे मृत्यू प्रकरण: नर्तिका पूजा गायकवाडच्या पोलीस कोठडीत वाढ

Beed Upsarpanch Govind Murder News : बार्शी न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली; पोलीस आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेची करणार चौकशी

V
Vivek

1 मिनिट वाचन

माजी उपसरपंच गोविंद बर्गे मृत्यू प्रकरण: नर्तिका पूजा गायकवाडच्या पोलीस कोठडीत वाढ

Beed Upsarpanch Govind Murder News : बार्शी न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली; पोलीस आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेची करणार चौकशी

बीड :- बीड जिल्ह्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे Beed Govind Burge Murder यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड हिच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. पोलीस कोठडी संपल्यानंतर आज तिला बार्शी न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पूजाला आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवून दिली आहे. Beed Latest Crime News

पोलिसांच्या मागणीची कारणे

गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला, या प्रश्नाभोवती तपास केंद्रित आहे. पोलिसांनी न्यायालयात पूजाच्या कोठडीची मागणी करताना काही महत्त्वाची कारणे दिली:

पिस्तुलाचा स्रोत: गोविंद बर्गे यांनी पिस्तूल कुठून आणले, याचा तपास करायचा आहे.

आर्थिक व्यवहार: पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे यांच्यातील आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.

जमिनीचा तपास: वैराग येथील जो प्लॉट पूजा गायकवाडच्या नावावर आहे, त्यात गोविंद बर्गे साक्षीदार आहेत. हा प्लॉट पूजाने कसा मिळवला, याचा तपास करायचा आहे.

या सर्व बाबींचा तपास करण्यासाठी पोलिसांना अधिक वेळ हवा असल्याने न्यायालयाने त्यांची मागणी मान्य केली.

आत्महत्या की घातपात?

गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे हे पारगाव येथील कला केंद्रात नर्तिका असलेल्या पूजा गायकवाडच्या प्रेमात होते. तिच्यासाठी त्यांनी महागडे मोबाईल, सोने, पैसे आणि प्लॉटही खरेदी करून दिले होते. मात्र, पूजाला गोविंदकडून गेवराई येथील आलिशान घरही हवे होते, याच कारणावरून त्यांच्यात वाद होत असल्याचे समोर आले आहे.

गोविंदच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, याच तणावातून त्याने आत्महत्या केली असावी. तसेच, गोविंदकडे बंदूक नव्हती, त्यामुळे त्याचा घातपात झाल्याचा संशयही त्याच्या भाच्याने व्यक्त केला आहे. आता ही बंदूक नेमकी कुठून आली आणि या मृत्यूमागे नेमके सत्य काय आहे, याचा तपास वैराग पोलीस करत आहेत. पुढील दोन दिवसांत या प्रकरणात आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे.

शेअर करा