मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Fake IAS : तोतया IAS च्या रॅकेटमध्ये खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे नाव! - हिंगोलीच्या खासदारांकडून 'मंदिरासाठी मदत' केल्याचा दावा

Sambhaji Nagar IAS Scam : पाकिस्तानी संबंधांच्या संशयाखालील महिलेला अटक; खासदारांनी दिली 20 हजार रुपयांसह इतर मदत; नेमके काय घडले?

V
Vivek

1 मिनिट वाचन

Fake IAS : तोतया IAS च्या रॅकेटमध्ये खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे नाव! - हिंगोलीच्या खासदारांकडून 'मंदिरासाठी मदत' केल्याचा दावा

Sambhaji Nagar IAS Scam : पाकिस्तानी संबंधांच्या संशयाखालील महिलेला अटक; खासदारांनी दिली 20 हजार रुपयांसह इतर मदत; नेमके काय घडले?

छत्रपती संभाजीनगर :- छत्रपती संभाजीनगरमधील एका बड्या हॉटेलमध्ये बनावट कागदपत्रे वापरून सहा महिने वास्तव्यास असलेल्या आणि पाकिस्तान तसेच अफगाणिस्तानमध्ये संबंध असल्याचा संशय असलेल्या कल्पना भागवत नामक महिलेच्या अटकेमुळे खळबळ उडाली आहे. ही महिला स्वतःला आयएएस अधिकारी असल्याचे सांगत होती आणि तिच्या चौकशीतून मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. या महिलेला पैसे देणाऱ्या 11 जणांच्या यादीत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे नाव समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

खासदार आष्टीकर यांनी दिली प्रतिक्रिया

या प्रकरणात नाव आल्यानंतर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे.त्यांनी मान्य केले की त्यांची आणि त्या तोतया अधिकाऱ्याची भेट झाली होती. त्यांच्या चुलत भावाच्या मुलाची या महिलेशी ट्रेनमध्ये भेट झाली होती आणि तिने मंदिराला देणगी देण्याची विनंती केली होती. त्यानंतर ही महिला त्यांच्या गावी येऊन भेटली.

"रामभद्राचर्य महाराज यांची ती शिष्य असल्याचे सांगत होती. मुलाखतीच्यादरम्यान अधिकाऱ्यांनी माझ्यावर अन्याय केला असे तिने मला सांगितले होते. मंदिरासाठी मदत मागितली, बरं मी 20 हजार रुपये सुरुवातीला मदत केली होती, त्यानंतरही मी 2-3 वेळा काही पैसे दिले," असे त्यांनी सांगितले.

इतर मदत: आई आजारी असल्याचे कारण देऊन तिने दीड लाख रुपयांची मागणी केली होती. तसेच, तिचा कोल्हापूर येथे अपघात झाल्याचे एका पुरुषाने फोनवर सांगितल्यावर त्यांनी तिला 10 हजार रुपये दिले होते.

शेवटचा व्यवहार: "29 ऑक्टोबर रोजी मी शेवटचे पैसे पाठवले आहेत," अशी माहिती त्यांनी दिली.

गुट्टे यांनी सांगितले की, त्यांनी हा विषय खूप गांभीर्याने घेतला नव्हता, पण गरज आहे म्हणून मदत केली होती. ते म्हणाले, "माझ्या वडिलांपासून मी राजकारणात आहे. मला पद्मश्री वैगेरे का देतील. माझ्याकडे जेवढं असतं तेवढं मी वाटप करत असतो."

सध्या अटक करण्यात आलेली कल्पना भागवत ही पाकिस्तानमधूनही मोठ्या प्रमाणात पैसा मिळवत होती. तिच्याकडून अनेक धक्कादायक कागदपत्रे आणि मोबाईलमधून महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून, तिची कसून चौकशी सुरू आहे.

शेअर करा