मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Fahad Ahmad News : स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांचा लौकिक वाढले, शरद पवारांच्या पक्षात मोठी जबाबदारी

Fahad Ahmad News : विधानसभा निवडणुकीतही शरद पवार यांनी अणुशक्तीनगर मतदारसंघातून फहाद अहमद यांना उमेदवारी दिली होती.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Fahad Ahmad News : स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांचा लौकिक वाढले, शरद पवारांच्या पक्षात मोठी जबाबदारी

Fahad Ahmad News : विधानसभा निवडणुकीतही शरद पवार यांनी अणुशक्तीनगर मतदारसंघातून फहाद अहमद यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांना निवडणूक जिंकता आली नाही.

मुंबई :- फहाद अहमद Fahad Ahmad News यांची शरद पवार Sharad Pawar यांच्या पक्षाच्या युवा विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. फहाद अहमद यांनी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अणुशक्तीनगर मतदारसंघातून लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. फहाद अहमद हा अभिनेत्री स्वरा भास्करचा नवरा आहे.

पक्षाचे सरचिटणीस राजीव कुमार झा यांनी नियुक्तीचे पत्र जारी केले आहे. ज्यात लिहिले आहे,'"आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या शिफारशीनंतर आणि राष्ट्रवादी-सपा अध्यक्ष शरद पवार आणि कार्यकारिणी राष्ट्रीय अध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या मान्यतेनंतर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) राष्ट्रीय अध्यक्षपदी तुमची त्वरित प्रभावाने नियुक्ती झाल्याबद्दल मला आनंद होत आहे."

त्यात पुढे असे लिहिले आहे की, “आम्हाला आशा आहे की तुम्ही राष्ट्रीय स्तरावर युवा समाजाच्या कल्याणासाठी पूर्ण उत्साहाने, समर्पण आणि प्रामाणिकपणाने लढा आणि त्याच बरोबर पक्षाला बळकट कराल. तुम्हाला अनेक शुभेच्छा.

जितेंद्र आव्हाड यांनी फहाद अहमद यांचे अभिनंदन केले आहे. 'एक्स' वर नियुक्ती पत्र शेअर करताना त्यांनी लिहिले,NCP-SP चे राष्ट्रीय युवा अध्यक्ष झाल्याबद्दल फहाद यांचे अभिनंदन. तुमच्यातील कार्यकर्त्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि तुम्ही चमत्कार कराल.

शेअर करा