मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Eknath Shinde : एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क, सर्वोच्च न्यायालयातील 'धनुष्यबाणा'वर लक्ष?

• खासदारांच्या प्रश्नांसाठी दिल्लीवारीचे स्पष्टीकरण, मात्र न्यायालयीन लढाईच्या पार्श्वभूमीवर भेट महत्त्वाची

V
Vivek

1 मिनिट वाचन

Eknath Shinde And Team India

•खासदारांच्या प्रश्नांसाठी दिल्लीवारीचे स्पष्टीकरण, मात्र न्यायालयीन लढाईच्या पार्श्वभूमीवर भेट महत्त्वाची

ठाणे :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिंदे यांची ही भेट राज्यातील खासदारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी असल्याचे स्पष्टीकरण दिले असले, तरी या दिल्लीवारीमागे राजकीय आणि न्यायालयीन अशी दोन्ही प्रमुख कारणे असल्याची चर्चा सध्या तीव्र झाली आहे.

एकनाथ शिंदे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. याशिवाय, ते पक्षाच्या खासदार आणि काही राज्य प्रमुखांनाही भेटणार आहेत. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनादरम्यान शिंदे आपल्या खासदारांसह केंद्रीय मंत्र्यांना आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) प्रमुख नेत्यांना भेटतील, असेही सामंत यांनी नमूद केले आहे.

मात्र, शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचे मुख्य कारण वेगळेच असल्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. येत्या काळात सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षचिन्ह आणि नावाबाबत महत्त्वाचा निर्णय येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, एकनाथ शिंदे दिल्लीत काही ज्येष्ठ विधीज्ञांची भेट घेऊन कायदेशीर सल्ला घेणार असल्याचे समजते. पक्षाच्या भवितव्यासाठी हा न्यायालयीन लढा अत्यंत महत्त्वाचा असल्याने, शिंदे यांची ही दिल्लीवारी केवळ प्रशासकीय स्वरूपाची नसून, ती राजकीय आणि कायदेशीर रणनीतीचा एक भाग असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा: Transfer Orders : महाराष्ट्रात प्रशासकीय फेरबदल; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा, ठाणे, जालना जिल्ह्यांत नवे चेहरे

शेअर करा