मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Eknath Shinde : लाल किल्ल्याजवळील स्फोटात 9 बळी, 22 जखमी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या संवेदना

Eknath Shinde ON Delhi Blast : दिल्ली हादरली!

V
Vivek

2 मिनिट वाचन

Eknath Shinde

Eknath Shinde ON Delhi Blast : दिल्ली हादरली! कार स्फोटानंतर राष्ट्रीय राजधानीत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; देशभर तीव्र प्रतिक्रिया

मुंबई :- राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला परिसरात काल (सोमवार) सायंकाळी झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर-1 च्या बाहेर हा स्फोट झाला, ज्यात किमान 8 जणांचा मृत्यू झाला असून, 12 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनेचा तपशील आणि तपास

संध्याकाळी स्फोट होताच जवळच्या काही वाहनांना आग लागल्याने घटनास्थळी भीषण दृश्य निर्माण झाले होते. तातडीने दिल्ली पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या एलएनजेपी (LNJP) आणि एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, प्राथमिक तपासात कारमध्ये झालेल्या विस्फोटक स्फोटाची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुरक्षादलांनी संपूर्ण परिसर सील करून तपास सुरू केला आहे.

राजकीय प्रतिक्रिया

या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा देशाच्या राजधानीतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी या स्फोटाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरून आपली भावना व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे:

"दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटात निष्पाप नागरिकांच्या झालेल्या मृत्यूची बातमी अत्यंत दुःखद आहे. या घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना. या कठीण परिस्थितीत आम्ही दिल्लीतील नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत."

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं?

दिल्लीत सोमवारी सायंकाळी लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्थानकाशी झालेल्या स्फोटात काही कुटुबियांनी आपले आप्त गमावले, अनेक जण जखमी झाले. या भयानक दुर्घटनेमुळे संपूर्ण देश हळहळतोय. मी व्यक्तिशः आणि शिवसेना पक्षातर्फे सहवेदना व्यक्त करतो, आणि या दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांना अंतःकरणपूर्वक श्रध्दांजली वाहतो. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे या तपासावर लक्ष ठेवून आहेत. या घटनेनंतर राजधानी दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून तपासाअंती स्फोटामागील कारणे स्पष्ट होतीलच, असे शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच या घटनेबाबत सद्गती आणि सहवेदनाही त्यांनी व्यक्त केली आहे.

शेअर करा