मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

"नशेचा विळखा म्हणजे मृत्यूकडे वाटचाल!" — वरिष्ठ पोलिस निरीक्षक विशाल म्हस्के यांचा इशारा

• अंमली पदार्थांविरोधी दिनानिमित्त जनजागृती व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

V
Vivek

1 मिनिट वाचन

"नशेचा विळखा म्हणजे मृत्यूकडे वाटचाल!" — वरिष्ठ पोलिस निरीक्षक विशाल म्हस्के यांचा इशारा

•अंमली पदार्थांविरोधी दिनानिमित्त जनजागृती व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे | “अंमली पदार्थांचे सेवन हे केवळ आरोग्याचाच नाही तर माणसाच्या संपूर्ण आयुष्याचा विनाश घडवते. अशा पदार्थांसाठी पैसा नसेल तर व्यक्ती गुन्हेगारीकडे वळते,” असा स्पष्ट आणि थेट इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल म्हस्के यांनी दिला.

ते सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात आयोजित ‘अंमली पदार्थ विरोधी जनजागृती’ व्याख्यानात बोलत होते. 26 जून रोजी जागतिक अंमली पदार्थविरोधी दिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकातर्फे 23 ते 28 जूनदरम्यान विविध जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत.

या विशेष व्याख्यानात सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश गावीत यांनी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांच्या आयुष्याची भयावहता उलगडून दाखवली. शायरीच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये भावनिक जनजागृती केली.

कॉज फाउंडेशनच्या अध्यक्षा कल्पना मोरे यांनी मुलींना स्व-सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचे मार्गदर्शन केले. "परिचयाच्या नावाखाली बऱ्याच वेळा अंमली पदार्थ मुलींना नकळत दिले जातात. त्यामुळे कोणतेही पेय घेताना ते सीलबंद आहे का, याची खात्री करणे अत्यावश्यक आहे," असा महत्त्वपूर्ण सल्लाही त्यांनी दिला.

हेही वाचा: Babanrao Lonikar : "माझ्या अंगातला शेवटचा थेंबही शेतकऱ्यांविरोधात नाही" — बबनराव लोणीकर

शेअर करा