मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Devendra Fadnavis : बिहारच्या विजयानंतर मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल! "काँग्रेसची अवस्था एमआयएमपेक्षा वाईट"

Devendra Fadnavis On Rahul Gandhi : देवेंद्र फडणवीसांकडून बिहारच्या जनतेचे अभिनंदन; 'विकास आणि सुशासन' हाच प्रमुख मुद्दा ठरल्याचा दावा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Devendra Fadnavis : बिहारच्या विजयानंतर मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल! "काँग्रेसची अवस्था एमआयएमपेक्षा वाईट"

Devendra Fadnavis On Rahul Gandhi : देवेंद्र फडणवीसांकडून बिहारच्या जनतेचे अभिनंदन; 'विकास आणि सुशासन' हाच प्रमुख मुद्दा ठरल्याचा दावा

मुंबई :- बिहार विधानसभा निवडणुकीत Bihar Election भाजपप्रणित एनडीए NDAआघाडीने मिळवलेल्या मोठ्या यशानंतर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी आनंद व्यक्त करत काँग्रेस नेते राहुल गांधी Rahul Gandhi यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बिहारच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणि नितीश कुमार यांच्या सुशासनावर विश्वास ठेवून प्रचंड बहुमत दिले आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. Bihar Election Latest News

राहुल गांधींवर टीकास्त्र

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "जोपर्यंत राहुल गांधी अशाप्रकारे संवैधानिक संस्थांवर आरोप करतील, तोपर्यंत काँग्रेसची हालत अशीच राहील." काँग्रेसवर थेट हल्ला चढवताना ते म्हणाले, "काँग्रेसची हालत एमआयएमपेक्षाही खाली गेलीय. बिहारच्या इतिहासातील काँग्रेसचा हा सर्वात कमी स्कोअर आहे."

राहुल गांधी यांनी मत चोरीचा मुद्दा काढून यात्रा काढल्या, नदीत उड्या टाकल्या, डान्स करून बघितला; परंतु लोकांचा विश्वास मोदीजी आणि नितीश कुमार यांच्यावरच असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच, काँग्रेस आणि आघाडीतील पक्षांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

बिहार विजयाची कारणे

देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमधील विजयाची कारणे स्पष्ट केली."बिहारच्या जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, नितीश कुमारांच्या सुशासनावर विश्वास ठेऊन प्रचंड बहुमत दिलेलं आहे."

ते म्हणाले, "बिहार निवडणुकीत सगळे मुद्दे बाजुला पडले आहेत. विकास आणि सुशासन हाच प्रमुख मुद्दा ठरला. मोदीजी आणि नितीश कुमार यांचा चेहरा हाच प्रमुख मुद्दा ठरला."या निवडणुकीत 'प्रो-इन्कम्बन्सी' (Pro-Incumbency) दिसली, ज्यामुळे एनडीएला २०१० चा विक्रम मोडून मोठा विजय मिळाला, असे मत त्यांनी व्यक्त केले.

एकंदरीत, बिहारच्या निकालामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, मुख्यमंत्र्यांनी विजयाचे श्रेय थेट पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर आणि राज्याच्या विकासावर शिक्कामोर्तब केले आहे.

शेअर करा