मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Daund Latest News : नागरिकांना आवश्यक त्या उपाययोजना करा, जिल्हा प्रशासनाला सुप्रिया सुळे यांची विनंती

दौंड प्रतिनिधी , ता.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Daund Latest News : नागरिकांना आवश्यक त्या उपाययोजना करा, जिल्हा प्रशासनाला सुप्रिया सुळे यांची विनंती

दौंड प्रतिनिधी, ता. बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, इंदापूर, दौंड आणि परिसरात गेल्या काही दिवसांत विक्रमी अवकाळी पाऊस झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साठले असून नागरिकांना त्याचा ञास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे तर अनेक ठिकाणी शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी जिल्हाधिकारी पुणे यांच्याशी दोहा, कतार येथून दूरध्वनी वरुन संपर्क साधून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत. Daund Latest News


बारामती लोकसभा मतदार मतदारसंघातील परिस्थितीची सातत्याने माहिती घेत असून याबाबत मी जिल्हा प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात देखील असल्याचे सुळे यांनी सांगितले. माझी जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की आपण आपत्ती व्यवस्थापनासह कृपया आरोग्याच्या दृष्टीने देखील उचित उपाययोजना कराव्यात. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. आणि गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावे अशी विनंती देखील सुप्रिया सुळे यांनी केली आहे. नागरिकांना आवाहन आहे की आपणास मदत हवी असेल तर तातडीने आम्हास पुढील नंबरवर संपर्क साधा

  • 9730304444
  • 8975139696
  • 9764558358
  • 9922216450
  • शेअर करा