मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Cyber Fraud News : सायबर भामट्यांनी 'डिजिटल अरेस्ट'चा बनाव रचत तरुणाकडून उकळले आठ लाख!

Cyber Fraud Latest News : नोकरी करणाऱ्या तरुणास ड्रग्ज तस्करीच्या खोट्या आरोपात अडकवले

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pune Fraud News: Fraud of Rs 74 lakhs in two places with the lure of house and job!

Cyber Fraud Latest News : नोकरी करणाऱ्या तरुणास ड्रग्ज तस्करीच्या खोट्या आरोपात अडकवले

मुंबई : फसवणुकीचे तंत्र अधिकाधिक गूढ होत चालले असताना सायबर गुन्हेगारांनी एका तरुणावर 'डिजिटल अरेस्ट'ची टांगती तलवार टाकून तब्बल आठ लाख रुपये लुबाडले. Cyber Fraud News ही घटना काळाचौकी परिसरातील असून सायबर ठगांनी ड्रग्ज तस्करी, बनावट कुरिअर आणि बनवाबनवी खात्यांद्वारे ही शक्कल उभी केली. Mumbai Latest Cyber Crime News

30 वर्षीय तरुण एका खासगी कंपनीत कामाला असून, जून 2024 मध्ये त्याला अज्ञात क्रमांकावरून फोन आला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने त्याच्या नावावर इराणहून आलेले एक संशयास्पद पाकीट अंधेरीतील कुरिअर कार्यालयात अडवले गेले असल्याचा बनाव केला. या पाकिटात अमली पदार्थ, बनावट पासपोर्ट आणि विविध डेबिट कार्ड असल्याचे भासवून त्याच्यावर कारवाई होणार असल्याची भीती निर्माण करण्यात आली. Mumbai Latest digital arrest Fraud News

त्यानंतर स्काईप लिंक पाठवून त्याला मुंबई अंमली पदार्थ विभागाशी 'थेट' जोडले गेले. स्क्रीन शेअर करायला लावून, बँक खात्यांतील कोट्यवधींचा गैरव्यवहार दाखवत त्याला घाबरविण्यात आले. स्वतः निर्दोष असल्याचा पुनःपुन्हा दावा करूनही, त्याच्याकडून खात्यातील सात लाख सत्तर हजार रुपये आणि एक लाख रुपये गुगल पेने वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करून घेतले गेले.

घडल्यावर काही वेळातच संपर्क तुटला. धक्का बसलेला तरुण दीर्घकाळ शांत राहिला. अखेर 11 महिन्यांनी त्याने काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. सध्या पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचे व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

शेअर करा