मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Crowfed Market Fire News : क्रॉफर्ड मार्केटमधील 'बाटा' शोरूमला भीषण आग; लाखोंचे बूट-चपला जळून खाक

Mumbai Latest Fire News : द्वारकादास इमारतीतील दुमजली शोरूममध्ये आग; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

V
Vivek

1 मिनिट वाचन

Crowfed Market Fire News : क्रॉफर्ड मार्केटमधील 'बाटा' शोरूमला भीषण आग; लाखोंचे बूट-चपला जळून खाक

Mumbai Latest Fire News : द्वारकादास इमारतीतील दुमजली शोरूममध्ये आग; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

मुंबई :- दक्षिण मुंबईतील खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या क्रॉफर्ड मार्केट परिसरातील 'बाटा' (Bata) या दुमजली शोरूमला रविवारी रात्री सुमारे साडे दहा वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली. मध्यरात्रीपर्यंत अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग विझवण्यात यश आले असले तरी, या आगीत शोरूममधील लाखोंचे बूट आणि चपला जळून खाक झाले आहेत.

मध्यरात्रीपर्यंत शर्थीचे प्रयत्न

द्वारकादास या चार मजली इमारतीतील 'बाटा' शोरूममध्ये ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला आगीची तीव्रता कमी असल्याने 'क्रमांक 1'ची वर्दी देण्यात आली होती, मात्र थोड्याच वेळात आगीचे लोळ वाढल्याने 'क्रमांक २'ची वर्दी देण्यात आली.

आग विझवण्यासाठी घटनास्थळी 8 फायर इंजिन, 6 जंबो टँकर,1 रेस्क्यू व्हॅन तसेच इतर आवश्यक साहित्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रात्री साडे बारा वाजता ही आग पूर्णपणे विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आग प्रामुख्याने बाटा शोरूममधील साहित्यापुरती मर्यादित होती. रात्रीची वेळ असल्याने शोरूम बंद होते आणि या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणी जखमी झाल्याची नोंद नाही. मात्र, लागलेल्या आगीमुळे शेजारच्या दुकानांमधूनही धूर बाहेर येताना दिसला. या आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

शेअर करा