मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

मतमोजणी 21 डिसेंबरलाच! - नागपूर खंडपीठाचा निकाल मान्य; पण प्रक्रियेतील त्रुटींवर मुख्यमंत्र्यांची नाराजी

Devendra Fadnavis On Maharashtra Election : "घोषित निवडणुका पुढे ढकलणे योग्य नाही"; 'कायद्याचा चुकीचा अर्थ लावला गेला', देवेंद्र फडणवीस यांचे परखड मत

V
Vivek

1 मिनिट वाचन

मतमोजणी 21 डिसेंबरलाच! - नागपूर खंडपीठाचा निकाल मान्य; पण प्रक्रियेतील त्रुटींवर मुख्यमंत्र्यांची नाराजी

Devendra Fadnavis On Maharashtra Election : "घोषित निवडणुका पुढे ढकलणे योग्य नाही"; 'कायद्याचा चुकीचा अर्थ लावला गेला', देवेंद्र फडणवीस यांचे परखड मत

मुंबई :- राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेला निकाल स्वीकारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीची प्रक्रिया आणि कायद्याच्या अर्थबोधनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयीन खटल्यांच्या पेचामुळे 24 नगरपरिषदा आणि 154 सदस्यांच्या निवडीसाठी होणारे मतदान 20 डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडले आहे, त्यामुळे दोन्ही टप्प्यांतील निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबर रोजी एकाच वेळी जाहीर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. Maharashtra Local Body Election

मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालावर बोलताना अनेक वर्षांचा अनुभव नमूद केला.

"मी अजून निकाल वाचलेला नाही, पण खंडपीठाने दिलेला निकाल सगळ्यांना मान्यच करावा लागेल. मागचे 25 ते 30 वर्षे मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतोय. पण असं पहिल्यांदा घडतं आहे की, घोषित केलेल्या निवडणुका पुढे चालल्या आहेत, त्याचे निकाल पुढे चालले आहेत. ही जी काही पद्धती आहे, ती योग्य वाटत नाही."

त्यांनी यंत्रणेच्या चुकांमुळे उमेदवारांचा भ्रमनिरास होत असल्याकडे लक्ष वेधले. "खूप निवडणुका निवडणूक आयोगाला घ्यायच्या आहेत. या सगळ्या प्रक्रियेत निवडणूक आयोगाने सुधारणा केली पाहिजे आणि किमान पुढच्या निवडणुकांमध्ये तरी असं होणार नाही, हे निवडणूक आयोगाने पाहिलं पाहिजे."

फडणवीस यांनी कायद्याच्या अर्थबोधनावर थेट आक्षेप घेतला. "माझं मत असं आहे की जो कायदा आहे, त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. कुणीतरी कोर्टात गेलं आणि त्याला दिलासाही मिळाला नाही, तरीही निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या, हे चुकीचं आहे."
"नाराजी प्रक्रियेवर, आयोगावर नाही"
फडणवीस यांनी स्पष्ट केले की, त्यांची नाराजी निवडणूक आयोगावर नसून कायदेशीर प्रक्रियेवर आहे. केवळ 24 ठिकाणी निवडणूक होणं बाकी असताना, सगळीच्या सगळी मतमोजणी पुढे ढकलणं हे त्यांना योग्य वाटत नाही.

शेअर करा