Bribe News : महावितरणचा 'शॉक'! ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी दीड लाखांची लाच घेताना सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात
Kha lapur Latest Bribe News : खालापूरमधील चौक सेक्शन कार्यालयात रायगड एसीबीची मोठी कारवाई; योगेश देसाई रंगेहाथ अटकेत
1 मिनिट वाचन

Khalapur Latest Bribe News : खालापूरमधील चौक सेक्शन कार्यालयात रायगड एसीबीची मोठी कारवाई; योगेश देसाई रंगेहाथ अटकेत
खालापूर (रायगड) :- व्यावसायिक कामासाठी ट्रान्सफॉर्मर बसवून देण्याचे इस्टिमेट तयार करण्यासाठी 1 लाख 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (MSEDCL) सहायक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. रायगड-अलिबाग एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी चौक सेक्शन-2 कार्यालयात हा सापळा यशस्वी केला. Khalapur ACB Latest Trap News
नेमके प्रकरण काय?
तक्रारदार यांना पाली बुद्रुक (ता. खालापूर) येथील गट नं. 25, प्लॉट नं.05 या ठिकाणी त्यांच्या व्यवसायासाठी 200 केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवायचा होता. यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक इस्टिमेट तयार करून देण्यासाठी सहायक अभियंता योगेश ताकाजी देसाई (वय 40) यांनी 1 लाख 70 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने 5 मार्च 2026 रोजी या भ्रष्टाचाराबाबत एसीबीकडे धाव घेतली. 9 मार्च रोजी करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये, देसाई यांनी तडजोडीअंती 1 लाख 50 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
एसीबीचा सापळा आणि अटक
मंगळवारी (10 मार्च) दुपारीच्या सुमारास, खालापूर तालुक्यातील चौक सेक्शन-2 येथील कार्यालयात लाचेची रक्कम स्वीकारण्याचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे तक्रारदार पैसे घेऊन पोहोचले. देसाई यांनी लाचेची रक्कम 1.50 लाख रुपये हाताने स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना पंचांसमक्ष रंगेहाथ ताब्यात घेतले.
तपास पथक आणि वरिष्ठ अधिकारी
ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे आणि सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.सरिता भोसले (पोलीस उपअधीक्षक, एसीबी रायगड), निशांत धनवडे (पोलीस निरीक्षक, एसीबी रायगड).,विनोद जाधव, अरुण करकरे, महेश पाटील, पराग ठाकूर, सुमित पाटील आणि इतर कर्मचारी.
या कारवाईमुळे महावितरण विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आरोपी योगेश देसाई यांच्याविरुद्ध खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.




