मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Bhiwandi Crime News मोटार सायकल चोरी करणार्‍या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला अटक

Shanti Nagar Police Arrested Robbers : मोटार सायकल चोरी करणार्‍या चार आरोपींना शांतीनगर पोलिसांच्या कक्ष गुन्हे शाखा-2 यांनी अटक करून त्यांच्याकडून 2 लाख 91 किंमतीच्या मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Tadipar News : तडीपार गुन्हेगार जेरबंद, लाखो रुपयांचे सोने जप्त!
Bhiwandi Robbery News

Shanti Nagar Police Arrested Robbers : मोटार सायकल चोरी करणार्‍या चार आरोपींना शांतीनगर पोलिसांच्या कक्ष गुन्हे शाखा-2 यांनी अटक करून त्यांच्याकडून 2 लाख 91 किंमतीच्या मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत.

भिवंडी :- मोटार सायकल चोरी Bike Robbers In Bhiwandi करणार्‍या चार आरोपींना भिंवडी मधील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या Shantinagar Police Station कक्ष गुन्हे शाखेने चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 2.91 लाख किंमतीच्या मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत.

शांतीनगर पोलीस ठाण्यात Shanti Nagar Police Station भारतीय दंड संहिता कायदा कलम 379,201,411,34 या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या घटक-2 पोलीस तपास करत होते.भिवंडीचे अधिकारी व अंमलदार हे तपास करीत असताना त्यांना मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे संशयीत आरोपी मोहम्मद यासीन बाबू शेख उर्फ पठाण, (वय 38 वर्षे), तौसीफ मुख्तार शेख (वय 25), मल्लीक राफीद अब्दूल माजीद अंसारी (वय 24) , वाहिद अहमद मुसा शेख,(वय 35) सर्व राहणार, रा.मालेगाव, जि. नाशिक यांना संशयावरून ताब्यात घेवुन त्यांचेकडे केलेल्या चौकशी केली असता आरोपींना गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. तसेच आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी एकुण 6 मोटार सायकल चोरीचे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले असुन 11 वेगवेगळ्या कंपनीच्या मोटर सायकली असा एकुण 2.91 लाख रूपये किंमतीचा मु‌द्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस पथक
अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध - 1) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक 2 भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, पोलीस उप निरीक्षक रविंद्र पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चौधरी, पोलीस हवालदार थोरात, यादव, भोईर, जाधव, पोलीस शिपाई ठाकुर,सोनवणे, बैसाने यांनी केलेली आहे.

शेअर करा