मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Beed Anti Corruption Bureau: तूती झाडाची लागवड करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच, पंचायत समिती गेवराई, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत भ्रष्टाचार

Anti Corruption Bureau Arrested Bribe Person : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजी नगर यांची कारवाई ; तांत्रिक सहाय्यक अधिकाऱ्याला आणि खाजगी व्यक्तीला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

V
Vivek

2 मिनिट वाचन

Beed Anti Corruption Bureau: तूती झाडाची लागवड करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच, पंचायत समिती गेवराई, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत भ्रष्टाचार

Anti Corruption Bureau Arrested Bribe Person : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजी नगर यांची कारवाई ; तांत्रिक सहाय्यक अधिकाऱ्याला आणि खाजगी व्यक्तीला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

बीड :- शेतीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना राबवण्याकरिता तूती झाडाची लागवड करण्याची होती. या योजनेची फाईल मंजूर करण्यासाठी पंचायत समिती गेवराई जिल्हा बीड, येथील तांत्रिक सहाय्यक अधिकारी संदीप रोहिदास राठोड (34, वर्ष) यांनी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपयाची लाच मागितली होती. 10 Thousand Bribe लाचलुजपत प्रतिबंध विभाग, छत्रपती संभाजीनगर यांनी कारवाई करत पंचायत समितीच्या तांत्रिक सहाय्यकाला आणि खाजगी व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. शासनाच्या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. Anti Corruption Bureau Latest News

गॅरेजवर लाच स्वीकारताना एसीबीची धाड

शेतीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना राबवण्याकरिता तुती झाडांची लागवड करायची होती. त्यासाठी तक्रारदार यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फाईल मंजूर करण्यासाठी पंचायत समिती गेवराई तांत्रिक सहाय्यक संदीप राठोड यांनी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपयाची पंचासमक्ष मागणी केली होती. तसेच ही रक्कम चंद्रकांत धर्मराज शेळके (25 वर्ष, फिटर,माऊली ऑटो गॅरेज,गेवराई) याच्याकडे जमा करण्यासाठी सांगितली होती. एसीबीने सापळा रचून माऊली हॉटेल गॅरेज सिव्हिल सर्कल ग्रामीण हॉस्पिटल जवळ स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. तसेच आरोपींना ताब्यात घेतली असून त्यांच्यावर गेवराई पोलीस ठाण्यात Gevrai Police Staion गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. Anti Corruption Bureau Latest News

एसीबी पथक

संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर,मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर, राजीव तळेकर पोलीस उपाधीक्षक छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी संगीता पाटील पोलीस उप अधिक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर,सापळा पथक - पोलीस हवालदार, सुनील पाटील, पोलीस अंमलदार, विलास चव्हाण ,सी. एन. बागुल ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर यांनी आरोपींना लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे.

हेही वाचा: Harshad Patankar : कोण आहे गँगस्टर हर्षद पाटणकर? तुरुंगातून सुटल्यानंतर निघाली मिरवणूक, आता पोलिसांनी ही कारवाई केली

हेही वाचा: Mumbai Spa Murder : मुंबई 'स्पा' हत्याकांडात मोठा खुलासा, पाच जणांना अटक, जाणून घ्या गुरु वाघमारे खून प्रकरणाची संपूर्ण कहाणी.

शेअर करा