मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Bangladeshi Illgeal Migrants : आता मालकही होणार जेलबंद! बांगलादेशी घुसखोरांना कामावर ठेवणाऱ्या व्यावसायिकांवर होणार थेट कारवाई

Government Will Take Action On Illegale Migrants : राज्य सरकारचे कठोर परिपत्रक; स्वस्त मजुरांच्या नावाखाली राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्यांची खैर नाही; बनावट कागदपत्रे रोखण्यासाठी 'ऑनलाइन पडताळणी' अनिवार्य

V
Vivek

1 मिनिट वाचन

Bangladeshi Illgeal Migrants : आता मालकही होणार जेलबंद! बांगलादेशी घुसखोरांना कामावर ठेवणाऱ्या व्यावसायिकांवर होणार थेट कारवाई

Government Will Take Action On Illegale Migrants : राज्य सरकारचे कठोर परिपत्रक; स्वस्त मजुरांच्या नावाखाली राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्यांची खैर नाही; बनावट कागदपत्रे रोखण्यासाठी 'ऑनलाइन पडताळणी' अनिवार्य

मुंबई | महाराष्ट्र सरकारने राज्याच्या अंतर्गत सुरक्षेसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे ज्या बांधकाम साइट्स, कारखाने किंवा छोट्या उद्योगांमध्ये बांगलादेशी घुसखोर काम करताना आढळतील, त्या आस्थापनेच्या मालकावर थेट कायदेशीर कारवाई केली जाईल. गृह विभागाने जारी केलेल्या नव्या आदेशानुसार, वैयक्तिक फायद्यासाठी देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांवर आता पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

'राष्ट्रीय सुरक्षा सर्वोच्च'; व्यावसायिकांना प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत यापूर्वीच स्पष्ट केले होते की, मुंबईतील विकासक आणि कंत्राटदारांना त्यांच्याकडे एकही बांगलादेशी कामगार नसल्याचे लेखी प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे.

प्रामुख्याने बांधकाम मजूर, मेकॅनिक, वेल्डर, वाहन चालक, प्लंबर आणि हॉटेलमधील वेटर या क्षेत्रांवर सरकारचे विशेष लक्ष असेल. जर वरील कामांवर संशयास्पद नागरिक आढळला, तर "आम्हाला माहिती नव्हती" असे सांगून मालकांना सुटका करून घेता येणार नाही. त्यांनाच यासाठी जबाबदार धरले जाईल.

बनावट कागदपत्रांना बसणार 'ऑनलाइन' चाप

घुसखोर नागरिक तंत्रज्ञानाचा वापर करून आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर शासकीय दस्तऐवजांमध्ये छेडछाड करत असल्याचे तपासात समोर आले आहे. यावर तोडगा म्हणून सर्व प्रशासकीय विभागांना 'ऑनलाइन पडताळणी प्रणाली' विकसित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.या प्रणालीमुळे अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे ज्या विभागाने जारी केली आहेत (उदा. निवडणूक आयोग किंवा महापालिका), तिथूनच ती खरी आहेत की नाही, याची खात्री तात्काळ करता येईल.

गावपातळीवर 'पोलीस पाटील' अलर्ट

शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही हे घुसखोर पसरण्याची भीती असल्याने, जिल्हाधिकाऱ्यांना विशेष आदेश देण्यात आले आहेत. ग्रामीण भागात कोणताही संशयास्पद नागरिक दिसल्यास त्याची माहिती तात्काळ पोलीस पाटलांना देणे बंधनकारक आहे. पोलीस पाटील ही माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला कळवतील, जेणेकरून ग्रामीण भागातील सुरक्षितता अबाधित राहील.

शेअर करा