मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Badlapur Latest Crime News : बदलापुरात 'पिशाच्चा'ची भीती दाखवून वृद्धाला 9 लाखांचा गंडा! भोंदू ज्योतिषांच्या टोळीला बेड्या; सोन्याच्या खिळ्यांचा बनाव उघड

Badlapur Latest Scam News : घरात अजून एकाचा मृत्यू होईल अशी घातली होती भीती; कामाख्या देवीच्या पूजेच्या नावाखाली लुबाडले लाखो रुपये आणि दागिने

V
Vivek

1 मिनिट वाचन

Badlapur Latest Crime News : बदलापुरात 'पिशाच्चा'ची भीती दाखवून वृद्धाला 9 लाखांचा गंडा! भोंदू ज्योतिषांच्या टोळीला बेड्या; सोन्याच्या खिळ्यांचा बनाव उघड

Badlapur Latest Scam News : घरात अजून एकाचा मृत्यू होईल अशी घातली होती भीती; कामाख्या देवीच्या पूजेच्या नावाखाली लुबाडले लाखो रुपये आणि दागिने

बदलापूर | अंधश्रद्धेचा आधार घेऊन सुशिक्षित नागरिकांना जाळ्यात ओढणाऱ्या भोंदूगिरीचा एक धक्कादायक प्रकार बदलापूरमध्ये उघडकीस आला आहे. मुंबईतील देवनार (गोवंडी) परिसरात राहणारे 63 वर्षीय चंद्रकांत चिले हे बदलापूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असताना, चार भोंदू ज्योतिषांनी त्यांना हेरले आणि त्यांच्या कौटुंबिक संकटाचा फायदा घेत लाखोंची लूट केली. Badlapur Latest Scam News

असा रचला जाळा: 'सोन्याचे खिळे' आणि 'कामाख्या देवी'

आरोपींनी चिले यांना गाठून त्यांच्या घरावर कुणीतरी 'पिशाच्च' सोडल्याची भीती घातली. "तुमच्या घरात नुकताच एकाचा मृत्यू झाला असून, योग्य वेळी पूजा न केल्यास लवकरच दुसऱ्या व्यक्तीचाही बळी जाईल," अशी भविष्यवाणी करत या टोळीने चिले यांचे मानसिक संतुलन बिघडवले. हे संकट टाळण्यासाठी कामाख्या देवीला जाऊन विशेष पूजा करावी लागेल आणि घरात सोन्याचे चार खिळे ठोकावे लागतील, अशी बतावणी करत त्यांनी चिले यांच्याकडून टप्प्याटप्प्याने 9 लाख 72 हजार रुपये आणि सोन्याचे दागिने उकळले.

अखेर भोंदूगिरीचा पडदा फाटला
अनेक दिवस उलटूनही घरावरील संकटे दूर होत नाहीत आणि केवळ पैशांची मागणी वाढत आहे, हे लक्षात आल्यावर चिले यांना आपली फसवणूक झाल्याची खात्री झाली. त्यांनी तातडीने बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. गुन्हे पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपास सुरू केला आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चारही आरोपींना बेड्या ठोकल्या.

अटक करण्यात आलेले आरोपी

1.ब्रम्हदत्त इंगळे

2.शिवलिंग इंगळे

3.भवानी इंगळे

4.(आणि अन्य एक साथीदार)

पोलिसांची कायदेशीर कारवाई
पोलिसांनी या चौघांविरुद्ध फसवणुकीसह (BNS), महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींनी अशाच प्रकारे इतरही कुणाची फसवणूक केली आहे का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

शेअर करा