Avinash Jadhav : मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर पाच कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप ; लोकमान्य टिळक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
•सोन्याच्या व्यापाऱ्याकडून अविनाश जाधव यांच्या विरोधात तक्रार दाखल, पाच कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप
1 मिनिट वाचन

•सोन्याच्या व्यापाऱ्याकडून अविनाश जाधव यांच्या विरोधात तक्रार दाखल, पाच कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप
ठाणे :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे व पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव Avinash Jadhav यांच्यावर पाच कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी लोकमान्य टिळक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोन्याच्या व्यापाऱ्याने अविनाश जाधव यांच्या विरोधात आरोप दाखल केला आहे. लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी खंडणी मारहाण व कट रचल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन (55 वर्षे) यांच्या तक्रारीनंतर वैभव ठक्कर व अविनाश जाधव Avinash Jadhav यांच्याविरोधात भादंवि कलम 385,143,147,323,120 ब अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार जैन यांनी ठक्करला झवेरी बाजार येथील जे. के. ज्वेलर्स या कार्यालयात हिशोबासाठी बोलावले होते. त्यावेळी जाधव त्यांचे सहकारी, अंगरक्षक व सहा ते सात व्यक्तींनी पोलिसांसमोर जैन यांचा मुलगा सौमिल याला मारहाण केली. यावेळी जाधव यांनी उचलून नेण्याची व नुकसान करण्याची धमकी देऊन जैन यांना पाच कोटी रुपयांसाठी धमकावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव Avinash Jadhav यांनी आपल्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने सुडाच्या भावनेतून केले असल्याचे स्पष्ट केले आहे. एका व्यक्तीने दूरध्वनीवरून कॉल करून मला आणि माझ्या पत्नीला दाबून ठेवले असे सांगितले त्यावेळी मी पोलिसांसह गेलो होतो. असे अविनाश जाधव यांनी सांगितले. ग्राहक आणि व्यापारी यांच्यातील वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी स्पष्ट सांगितले आहे.
- #महाराष्ट्र बातम्या लाईव्ह अपडेट्स
- #Maharashtra News
- #Top Marathi News
- #सुनेत्रा पवार बारामती
- #Raj Thackeray
- #महाराष्ट्र राजकारण
- #राहुल गांधी
- #ransom
- #मनसे
- #Avinash Jadhav
- #Sarafa
- #विधानसभा
- #लोकसभा सीट शेअरिंग
- #नरेंद्र मोदी
- #लोकसभा निवडणूक 2024
- #राज ठाकरे
- #मराठी बातम्या
- #मनोज जरांगे
- #मराठी बातम्या
- #उद्धव ठाकरे
- #मनोज जरांगे पाटील
- #खंडणी
- #एकनाथ शिंदे
- #प्रकाश आंबेडकर
- #marathi Live Tv
- #MNS
- #marathi news latest
- #लोकसभा
- #अविनाश जाधव
- #ताज्या बातम्या




