मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Avinash Jadhav : 'कोंबडा बनवणार' मनसेचा इशारा मिळताच 'माही खान'ची माघार! मराठी भाषेवरून वाद घालणाऱ्याची माफी

Avinash Jadhav On Mahi Khan : विमानात मराठी बोलण्यास विरोध केल्याचा व्हिडिओ व्हायरल; मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला होता थेट इशारा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Avinash Jadav

Avinash Jadhav On Mahi Khan : विमानात मराठी बोलण्यास विरोध केल्याचा व्हिडिओ व्हायरल; मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला होता थेट इशारा

मुंबई :- विमानात एका महिलेला मराठी बोलण्यास विरोध करत, तिचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करून वाद निर्माण करणाऱ्या माही खान नावाच्या व्यक्तीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते अविनाश जाधव यांनी दिलेल्या कडक इशाऱ्यानंतर काही तासांतच त्याने माफी मागितली आहे.

नेमके काय घडले?

माही खान या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला होता. विमानात एका महिलेने 'हळू-हळू भाऊ' असे मराठीत म्हटल्यामुळे, "मला मराठीत का बोलले?" असा वाद त्याने घातला आणि व्हिडिओ बनवून प्रसारित केला. या व्हिडिओमुळे संबंधित महिलेची बदनामी झाली असून, त्यांना आपली नोकरी गमवावी लागल्याचा गंभीर दावा त्यांनी केला आहे.

अविनाश जाधव यांचा संताप आणि इशारा

मनसे नेते अविनाश जाधव यांनी संबंधित महिलेला मनसे कार्यालयात बोलावून प्रकरण जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी माही खानवर तीव्र संताप व्यक्त केला:

"या भिकारड्याने फक्त व्ह्यूज आणि पैसे कमविण्यासाठी महिलेचा जॉब घालवला. आम्ही त्याला सोडणार नाही. यांच्या आजोबा, बापाला आम्ही पोसले आहे आणि तरीही मराठी बोलले जाणार नाही असे म्हणत असेल तर कान पकडून मराठी बोलायला लावीन. याला शोधून कोंबडा बसविला नाही तर माझे अविनाश जाधव नाव नाही."

इशारा मिळताच मागितली माफी

अविनाश जाधव यांच्या आक्रमक भूमिकेनंतर आणि 'कोंबडा बनवणार' या इशाऱ्यानंतर माही खानने तातडीने माघार घेतली. त्याने एक नवीन व्हिडिओ प्रसारित करून मराठी जनतेची माफी मागितली आहे.

तो म्हणाला, "मी संबंधित व्हिडिओ डाऊन केला आहे. मला कोणालाही दुखवायचे नव्हते. मराठी जनतेला वाईट वाटेल असे मला करायचे नव्हते. माझ्या व्हिडिओमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. मी जिथे राहतो तेथील संस्कृतीचा आदर करण्यावर विश्वास ठेवतो. मी मुंबईत येत असतो, जय महाराष्ट्र!"

मनसेच्या कडक भूमिकेमुळे आणि इशाऱ्यानंतर मराठी भाषेवरून वाद घालणाऱ्या व्यक्तीला तातडीने माघार घ्यावी लागल्याने जाधव यांच्या भूमिकेचे कौतुक होत आहे.

शेअर करा