मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Asim Sarode : 'निकाल' एकाच दिवशी लावा! - 22 नगरपरिषदांच्या निवडणुकींना स्थगिती मिळाल्यावर ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांची मोठी मागणी

Asim Sarode On Election Commision : सरोदेंची निवडणूक आयोगाला 'पारदर्शकते'ची विनंती; "पहिल्या टप्प्याचे निकाल 20 डिसेंबरपर्यंत रोखावे."

V
Vivek

1 मिनिट वाचन

Asim Sarode : 'निकाल' एकाच दिवशी लावा! - 22 नगरपरिषदांच्या निवडणुकींना स्थगिती मिळाल्यावर ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांची मोठी मागणी

Asim Sarode On Election Commision : सरोदेंची निवडणूक आयोगाला 'पारदर्शकते'ची विनंती; "पहिल्या टप्प्याचे निकाल 20 डिसेंबरपर्यंत रोखावे."

मुंबई :- राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, निवडणुकीच्या तोंडावर राज्य निवडणूक आयोगाने Election Commision काही नगरपरिषदा आणि प्रभागांतील निवडणुकांना स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे आता राज्यात 2 डिसेंबर आणि 20 डिसेंबर असे दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ वकील असीम सरोदे Advocate Asim Sarode यांनी ट्विट करत एक महत्त्वाची मागणी केली आहे.

सरोदे यांची मागणी काय?

सरोदे यांनी निवडणुकीतील पारदर्शकतेच्या दृष्टीने हा निर्णय आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,"नगर परिषद व नगरपंचायतीच्या काही निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने अचानक स्थगित केल्या आहेत. आपोआपच आता या निवडणुकांचा दुसरा मतदान टप्पा 20 डिसेंबर रोजी होणार. या पार्श्वभूमीवर आवश्यक आहे की 2 डिसेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान झाल्यावर तेथील नगर परिषद व नगरपंचायतीचे निकाल लगेच 3 डिसेंबरला जाहीर न करता सगळे निकाल 21 डिसेंबरला जाहीर करावेत."

निवडणूक आयोगाने तसे करणे, 'पारदर्शक व मोकळ्या वातावरणात प्रामाणिक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडावी' या कायदेशीर बंधनकारक जबाबदारीचा भाग आहे, असे सरोदे यांनी स्पष्ट केले आहे. एका टप्प्यातील निकाल आधी लागल्यास, त्याचा दुसऱ्या टप्प्यातील मतदारांवर किंवा राजकीय पक्षांच्या व्यूहरचनेवर परिणाम होऊ शकतो, हे या मागणीमागचे मुख्य कारण आहे.

भाजपचीही नाराजी

दरम्यान, निवडणूक आयोगाने अचानक निवडणुका पुढे ढकलल्याने यावर भाजपनेही नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "हे चुकीचं असल्याचं" मत व्यक्त केले होते. अचानक निवडणुका पुढे ढकलल्याने संबंधित उमेदवारांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला असून त्यांची प्रचाराची मेहनत वाया गेली आहे.

शेअर करा