मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

ASI Satish Lathar Suicide : आयपीएस अधिकाऱ्याच्या आत्महत्येला वेगळे वळण! आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याने गोळी झाडून संपवलं आयुष्य

• रोहतकमधील सायबर सेलमध्ये कार्यरत ASI सतीश लाठर यांची आत्महत्या ; मृत ASI च्या सुसाईड नोटमध्ये दिवंगत IPS वाय.

V
Vivek

2 मिनिट वाचन

ASI Satish Lathar Suicide : आयपीएस अधिकाऱ्याच्या आत्महत्येला वेगळे वळण! आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याने गोळी झाडून संपवलं आयुष्य

•रोहतकमधील सायबर सेलमध्ये कार्यरत ASI सतीश लाठर यांची आत्महत्या ; मृत ASI च्या सुसाईड नोटमध्ये दिवंगत IPS वाय. पूरन कुमार यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

ANI :- हरियाणातील वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी वाय. पूरन कुमार यांच्या आत्महत्येच्या (Y Puran Kumar Suicide) प्रकरणाला आता अत्यंत धक्कादायक वळण लागले आहे. त्यांच्याशी संबंधित एका प्रकरणाचा तपास करणाऱ्या रोहतक सायबर सेलमध्ये तैनात असलेल्या सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) सतीश लाठर यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

घटनेनंतर घटनास्थळी पोलिसांना तीन पानांची सुसाईड नोट आणि एक व्हिडिओ मेसेज सापडला आहे. या सुसाईड नोटमध्ये मृत एएसआय सतीश लाठर यांनी दिवंगत आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

'पूरन कुमार भ्रष्ट होते, अटक होईल म्हणून आत्महत्या केली'

आत्महत्या केलेल्या एएसआय लाठर यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, "आयपीएस वाय. पूरन कुमार हे भ्रष्टाचारात सहभागी होते आणि जातीवादाचा आधार घेऊन व्यवस्थेवर नियंत्रण मिळवत होते." या धक्कादायक पत्रात त्यांनी पुढे असाही दावा केला आहे की, "अटक होणार असल्याच्या भीतीनेच पूरन कुमार यांनी आत्महत्या केली." आपण भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध हे 'बलिदान' देत आहोत, असेही त्यांनी नमूद केले असून, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मृत एएसआय सतीश लाठर हे आयपीएस पूरन कुमार यांचा बॉडीगार्ड सुशील कुमार याच्याशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रकरणाच्या तपास पथकाचा भाग होते.

आयपीएस अधिकाऱ्यावरही होता गुन्हा दाखल

यापूर्वी 7 ऑक्टोबर रोजी आयपीएस वाय. पूरन कुमार यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांच्या पत्नी, आयएएस अधिकारी अमनीत पी कुमार यांनी पूरन कुमार यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटच्या आधारावर हरयाणाचे डीजीपी शत्रुघ्न कपूर आणि रोहतकचे एसपी नरेंद्र बिजार्निया यांच्यासह 14 अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आता एएसआय सतीश लाठर यांच्या आत्महत्येमुळे आणि त्यांच्या सुसाईड नोटमधील गंभीर आरोपांमुळे आयपीएस पूरन कुमार प्रकरणाला पूर्णपणे वेगळी दिशा मिळाली आहे. मृत एएसआयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, सुसाईड नोट आणि व्हिडिओ फॉरेन्सिक तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीनंतर हरियाणा पोलीस दलातील अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Mumbai News : निवडणूक आयोगाच्या कारभारावर विरोधी पक्षांनी घेतले आक्षेप!

शेअर करा