मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ashish Shelar : महायुतीत 'ठिणगी'! "सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील"; आशिष शेलारांचा अजित पवारांना खणखणीत इशारा

Ashish Shelar On Ajit Pawar : अमोल मिटकरींचे जशास तसे प्रत्युत्तर; "आम्ही शिव-शाहु-फुले-आंबेडकरी विचारांचेच राहणार!"

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ashish Shelar

Ashish Shelar On Ajit Pawar : अमोल मिटकरींचे जशास तसे प्रत्युत्तर; "आम्ही शिव-शाहु-फुले-आंबेडकरी विचारांचेच राहणार!"

मुंबई | महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील मित्रपक्षांमध्ये 'मैत्रीपूर्ण' लढतींऐवजी 'शत्रुत्वाची' भाषा सुरू झाली आहे. पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या सत्तेवर अजित पवारांनी केलेल्या "राक्षसी भूक" या टीकेचा वचपा काढताना आशिष शेलार यांनी थेट विचारधारेवरून अजित पवार गटाला घेरले आहे. यावर राष्ट्रवादीनेही (अजित पवार गट) तितक्याच आक्रमकपणे उत्तर दिल्याने युतीमधील दरी वाढल्याचे स्पष्ट होत आहे.

आशिष शेलारांचा 'सावरकर' वार

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी स्पष्ट शब्दांत ठणकावून सांगितले की, "आमचे रवींद्र चव्हाण म्हणतात त्याप्रमाणे आम्ही सावरकरांचे भक्त आहोत. अजित पवार यांच्या पक्षाला सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील." शेलार यांनी महायुतीच्या भविष्यावर भाष्य करताना 'एकला चलो रे'चा सूचक इशाराही दिला. ते म्हणाले, "तुम्ही याल तर तुमच्यासोबत, न याल तर तुमच्याशिवाय आणि विरोधात गेलात तर तुमच्या विरोधात आम्ही काम करू."

मिटकरींचे 'आंबेडकरी' प्रत्युत्तर

शेलार यांच्या या इशाऱ्याला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिले. "आम्ही शिव, शाहू, फुले आणि आंबेडकरी चळवळीशी बांधील होतो आणि राहू. आम्हाला तुमची विचारधारा मान्य करण्याची सक्ती करू नका," असे मिटकरी यांनी म्हटले आहे. उलट, "आमची आंबेडकरी विचारधारा तुम्हाला नाईलाजाने का होईना स्वीकारावी लागते, हेच त्रिवार सत्य आहे," अशा शब्दांत त्यांनी शेलारांवर पलटवार केला.

शेअर करा