मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ashish Shelar : शिवतीर्थावरील चाफा बोलेना…' आशिष शेलारांनी कवितेतून साधला ठाकरे बंधूंवर खोचक निशाणा!

Ashish Shelar On Thackeray Brother : राज-उद्धव भेटीच्या चर्चेवर भाजपची टोलेबाजी; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ashish Shelar : शिवतीर्थावरील चाफा बोलेना…' आशिष शेलारांनी कवितेतून साधला ठाकरे बंधूंवर खोचक निशाणा!

Ashish Shelar On Thackeray Brother : राज-उद्धव भेटीच्या चर्चेवर भाजपची टोलेबाजी; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

मुंबई :- मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षावर आणि ठाकरे बंधूंवर जोरदार शब्दांत टीका केली आहे. प्रसिद्ध कवी 'बी' यांच्या 'चाफा' या कवितेचे विडंबन करत शेलारांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य युती किंवा जवळीकतेवर उपरोधिक टीका केली आहे.

आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "बंधूप्रितीची ओढ लागलेल्या भयभीत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला ही कविता अर्पण." त्यांनी आपल्या कवितेत 'शिवतीर्थावरील चाफा बोलेना, चाफा चालेना' असे म्हणत राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानाचा संदर्भ दिला आहे. संजय राऊत आणि अनिल परब हे जुने मतभेद विसरून मैत्रीची गाणी गात आहेत, गळ्यात गळे मिळवून फिरत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

'येरे येरे गळ्या…' म्हणत डिवचले
शेलारांनी कवितेत पुढे म्हटले आहे की, "चल येरे येरे गळ्या, नाचू उडू घालू फुगड्या… तरीही चाफा बोलेना, चाफा चालेना." या ओळींमधून त्यांनी उद्धव ठाकरे गटाकडून राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी होत असलेल्या कथित प्रयत्नांवर निशाणा साधला आहे. "कितीही प्रयत्न केले तरी समोरून प्रतिसाद मिळत नाहीये," असे सुचवत त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला 'भयभीत' असे संबोधले आहे.

मंत्री आशिष शेलार यांचे ट्विट करून ठाकरेंना उद्देशून कविता

शिवतीर्थावरील चाफा !!

"चाफा" बोलेना चाफा चालेना… चाफा खंत करी काही केल्या फुले ना…

गेले संजय राऊत घरी…
म्हटली मैत्रीची गाणी…
आम्ही गळयांत गळे मिळवूनी रे
गेले अनिल परब सोबती…
गंध दरवळला शिवतीर्थावरी
जुने मतभेद विसरले रे
चल ये रे, ये रे गडया, नाचू उडू घालू फुगडया
खेळू झिम्मा झिम पोरी झिम पोरी झिम !

तरी ही चाफा बोले ना.. चाफा चालेना… चाफा काही केल्या फुले ना !!

(कवी बी यांची क्षमा मागून बंधूप्रितीची ओढ लागलेल्या भयभीत उबाठा सेनेला अर्पण)

शेअर करा