मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Arjun Tendulkar : तेंडुलकर कुटुंबात सनई-चौघडे! अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक अडकले विवाहबंधनात; मुंबईत रंगला शाही विवाह सोहळा

Arjun Tendulkar Marriage : वरळीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला सोहळा | दिग्गजांच्या उपस्थितीत अर्जुन-सानियाची 'नवी इनिंग' सुरू | सकाळी 11.45 च्या मुहूर्तावर बांधली लग्नगाठ

V
Vivek

1 मिनिट वाचन

Arjun Tendulkar : तेंडुलकर कुटुंबात सनई-चौघडे! अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक अडकले विवाहबंधनात; मुंबईत रंगला शाही विवाह सोहळा

Arjun Tendulkar Marriage : वरळीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला सोहळा | दिग्गजांच्या उपस्थितीत अर्जुन-सानियाची 'नवी इनिंग' सुरू | सकाळी 11.45 च्या मुहूर्तावर बांधली लग्नगाठ

मुंबई :- भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर याने आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे. अर्जुन आणि सानिया चंडोक यांचा विवाह सोहळा काल, मुंबईतील वरळी येथील एका भव्य पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. काल सकाळी 11.45 वाजताच्या शुभ मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडला.

दिग्गजांची उपस्थिती

सचिन तेंडुलकरच्या लाडक्या लेकाचे लग्न असल्याने या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. वरळीतील या शाही सोहळ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने:

खेळाडू: भारतीय क्रिकेट संघातील आजी-माजी खेळाडू आणि अर्जुनचे मुंबई इंडियन्स तसेच गोवा संघातील सहकारी.

राजकीय नेते: राज्यातील आणि केंद्रातील अनेक बडे नेते नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.

सेलिब्रिटी: बॉलिवूडमधील अनेक नामांकित कलाकार या लग्नाचे आकर्षण ठरले.

अर्जुन आणि सानियाची जोडी
अर्जुन तेंडुलकर सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याकडून खेळत असून त्याने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तर सानिया चंडोक आणि अर्जुन यांच्या मैत्रीचे रुपांतर आता लग्नात झाले आहे. लग्नाचे फोटो अद्याप अधिकृतपणे समोर आले नसले तरी, सोशल मीडियावर तेंडुलकर कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

फोटो गॅलरी

छायाचित्रे · 1/11

Arrow Keys ⟵ ⟶
शेअर करा