मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : अनिल अंबानींच्या मालमत्तेवर ईडीची टाच; ५१० कोटींची मालमत्ता जप्त

Mumbai News : मुंबई, महाराष्ट्र मिरर : कथित बँक घोटाळे आणि निधीच्या गैरवापराशी संबंधित मनी लाँड्रिंग तपासात ईडीने उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाची ५१० कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

अनिल अंबानींच्या मालमत्तेवर ईडीची टाच; ५१० कोटींची मालमत्ता जप्त
अनिल अंबानींच्या मालमत्तेवर ईडीची टाच; ५१० कोटींची मालमत्ता जप्त

Mumbai News : दोन खासगी विमाने, सहा फ्लॅट जप्त : आतापर्यंतची जप्ती २३ हजार कोटींवर

Mumbai News : मुंबई, महाराष्ट्र मिरर : कथित बँक घोटाळे आणि निधीच्या गैरवापराशी संबंधित मनी लाँड्रिंग तपासात ईडीने उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाची ५१० कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईत दोन खासगी विमाने, सहा फ्लॅट, जमीन, पवनचक्क्या, बँक ठेवी आणि विविध गुंतवणुकींचा समावेश आहे. या कारवाईनंतर अनिल अंबानी समूहाची आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेची एकूण किंमत २३ हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याचे ईडीने सांगितले.https://maharashtramirror.com/ Mumbai News
ईडीने जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये एम्ब्राएर लेगसी ६५० आणि डसॉल्ट फाल्कन २००० या दोन खासगी विमानांचा समावेश आहे. याशिवाय सहा फ्लॅट, जमीन, कार्यालयीन परिसर, पवनचक्क्या, बँक खात्यांमधील ठेवी, मुदत ठेवी आणि अन्य गुंतवणुकींवरही कारवाई करण्यात आली आहे.
ईडीच्या माहितीनुसार, रिलायन्स कम्युनिकेशन्स संबंधित प्रकरणात महाराष्ट्रातील दोन चार्टर्ड विमाने, सहा भूखंड आणि कार्यालयीन परिसर जप्त करण्यात आला आहे. तर रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड यांच्याशी संबंधित प्रकरणांत तामिळनाडूमधील दोन पवनचक्क्या, बँक खात्यांतील ठेवी, मुदत ठेवी आणि इतर गुंतवणुकी जप्त करण्यात आल्या आहेत.https://maharashtramirror.com/ Mumbai News
ईडीच्या तपासात रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड यांच्याशी संबंधित २६३.०५ कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा समावेश आहे. याशिवाय रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडशी संबंधित २४७.१२ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचाही तपास सुरू आहे. या दोन्ही प्रकरणांतील रकमेची बेरीज ५१०.१७ कोटी रुपये होते. या कारवाईबाबत अनिल अंबानी यांच्या समूहाच्या प्रवक्त्याने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. दरम्यान, ईडीचा तपास सुरू असून, संबंधित आर्थिक व्यवहार आणि मालमत्तांच्या स्रोतांबाबत पुढील तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

सीबीआय आणि पोलिसांच्या गुन्ह्यांवरून तपास


सीबीआय तसेच दिल्ली आणि मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या विविध एफआयआरच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला आहे. याशिवाय परकीय चलन व्यवस्थापन कायद्यांतर्गत दोन स्वतंत्र प्रकरणांचाही तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. या तपासाच्या कक्षेत रिलायन्स कम्युनिकेशन्स, रिलायन्स होम फायनान्स, रिलायन्स कमर्शियल फायनान्स, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स कॅपिटल या कंपन्यांचा समावेश असल्याचे ईडीने म्हटले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा