मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Amol Mitkari : 'लाडकी बहीण' योजनेला अजितदादांचे नाव द्या! आमदार अमोल मिटकरींची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

Amol Mitkari On Ladki Bhain Yojana : "योजनेचे खरे शिल्पकार दादाच"; स्मृती जपण्यासाठी मिटकरींचे भावनिक आवाहन, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

V
Vivek

1 मिनिट वाचन

Amol Mitkari : 'लाडकी बहीण' योजनेला अजितदादांचे नाव द्या! आमदार अमोल मिटकरींची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

Amol Mitkari On Ladki Bhain Yojana : "योजनेचे खरे शिल्पकार दादाच"; स्मृती जपण्यासाठी मिटकरींचे भावनिक आवाहन, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई | राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि प्रभावी अर्थमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी राज्यातील अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी 'लाडकी बहीण' योजनेला "अजितदादा पवार लाडकी बहीण योजना" असे नाव देण्यात यावे, असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे. या मागणीमुळे आता योजनेच्या नामकरणावरून राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

योजनेसाठी दादांनी तिजोरीचे दरवाजे उघडले अमोल मिटकरी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, "लाडकी बहीण योजना साकारण्यामागे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यामागे अजितदादांची दूरदृष्टी होती. राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण असतानाही, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांनी अर्थमंत्री म्हणून या योजनेला प्राधान्य दिले. ही योजना केवळ आर्थिक मदत नसून महिलांचा सामाजिक सन्मान आहे. त्यामुळे या योजनेला दादांचे नाव देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल."

श्रेयवादाच्या लढाईत नवे वळण?

'लाडकी बहीण' योजनेच्या श्रेयावरून महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये (भाजप, शिवसेना-शिंदे गट आणि राष्ट्रवादी-अजित पवार गट) सातत्याने चढाओढ पाहायला मिळाली आहे. आता अमोल मिटकरी यांनी थेट नामकरणाची मागणी केल्याने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आर्थिक ताण असूनही दादा ठाम होते अजित पवार यांनी अर्थमंत्री असताना ही योजना राबवताना राज्याच्या महसुली तुटीची आणि तिजोरीवरील ताणाची जाणीव करून दिली होती. मात्र, कोणत्याही परिस्थितीत लाडक्या बहिणींचा हप्ता थांबणार नाही, याची खबरदारी त्यांनी घेतली होती. याच पार्श्वभूमीवर ही मागणी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

शेअर करा