मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Amit Thackeray : 'हे मोगलाई सरकार!' नेरूळमधील शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा झाकला; मनसेचा तीव्र संताप

Amit Thackeray On Maharashtra Sarkar : 'तो कपडा पुन्हा काढून फेकू', अमित ठाकरेंचा थेट इशारा; बदनामी सहन न झाल्याने पालिकेने पुन्हा पुतळा बंदीस्त केल्याचा मनसेचा आरोप

V
Vivek

1 मिनिट वाचन

Amit Thackeray : 'हे मोगलाई सरकार!' नेरूळमधील शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा झाकला; मनसेचा तीव्र संताप

Amit Thackeray On Maharashtra Sarkar : 'तो कपडा पुन्हा काढून फेकू', अमित ठाकरेंचा थेट इशारा; बदनामी सहन न झाल्याने पालिकेने पुन्हा पुतळा बंदीस्त केल्याचा मनसेचा आरोप

नवी मुंबई (नेरूळ) :- नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) नेरूळ येथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुन्हा एकदा कापडाने झाकून बंदीस्त केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. सहा महिन्यांपासून अनावरण न करता घाणेरड्या कपड्याने झाकलेला हा पुतळा मनसे नेते अमित ठाकरे Amit Thackeray यांनी रविवारी (16 नोव्हेंबर) अचानक अनावरण करून खुला केला होता. या प्रकरणी अमित ठाकरेंसह 70 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मनसेचा 'मोगलाई'चा आरोप

पुतळा पुन्हा झाकल्यामुळे मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी महानगरपालिकेवर गंभीर आरोप करत म्हटले की, "महानगरपालिकेने छत्रपतींना बंदीस्त करून हे मोगलाई सरकार असल्याचे सिद्ध केले आहे." तसेच, मनसेने आता 'गनिमी काव्याचे अनावरण' करू, असा थेट इशाराही दिला आहे.

अमित ठाकरेंचा आक्रमक पवित्रा

गुन्हा दाखल झाल्यानंतरही अमित ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी पुन्हा पुतळा झाकल्याबद्दल नाराजी व्यक्त करत म्हटले:

माझ्या राजकीय आयुष्यातील पहिली केस ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आहे…
याचा मला अभिमान आहे!!!

काल माझ्या सहकाऱ्यांसह विधिवत आरती करून महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण केले गेले. पण महाराजांच्या पुतळ्यासह सभोवतालच्या मंडपाला आज पुन्हा घाणेरड्या कापडाने झाकून ठेवण्यात आलं आहे.

शेअर करा