मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : प्रशांत वाघमारे यांच्यावरील आरोप चुकीचे; समर्थक सरसावले

उपमहापौर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट

DJ
Dattatraya Jadhav

1 मिनिट वाचन

prashant waghmare
prashant waghmare

उपमहापौर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट

महाराष्ट्र मिरर न्यूज नेटवर्क
निलेश राऊत

पुणे , दि. ८ एप्रिल : पुणे महापालिकेचे माजी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यावर करण्यात आलेले आरोप पूर्णतः चुकीचे, निराधार आणि केवळ त्यांचे चारित्र्यहनन करण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहेत, अशी भूमिका घेत आज विविध मान्यवरांच्या शिष्टमंडळाने पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांची भेट घेतली. यावेळी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करावे, अशी विनंतीही आयुक्तांना करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून प्रशांत वाघमारे यांच्या संदर्भात समाजमाध्यमांतून आणि बातम्यांमधून पसरवली जाणारी माहिती ही दिशाभूल करणारी आहे. वाघमारे हे एक कर्तव्यदक्ष आणि शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणारे अधिकारी आहेत. त्यांच्या प्रदीर्घ सेवेला आणि प्रतिमेला धक्का लावण्यासाठी जाणीवपूर्वक हा प्रकार केला जात असल्याचे शिष्टमंडळाने आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.

याप्रसंगी उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेवक ॲड. अविनाश साळवे, बाळासाहेब जानराव, रिपाई शहराध्यक्ष संजय सोनवणे, रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे अध्यक्ष राहुल डंबाळे, महिपाल वाघमारे, ॲड. मोहन वाडेकर , माजी नगरसेवक जयदेव रंधवे आदी मान्यवर उपस्थित होते.

चारित्र्यहननाचा प्रयत्न खपवून घेणार नाही
आयुक्तांशी झालेल्या चर्चेदरम्यान शिष्टमंडळाने स्पष्ट केले की, हा संपूर्ण प्रकार केवळ एका चांगल्या अधिकाऱ्याचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी रचला गेला आहे. "आम्ही सर्वजण प्रशांत वाघमारे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. प्रशासनाने कोणाच्याही दबावाखाली न येता या प्रकरणाचा कायदेशीर लढा सर्वोच्च न्यायालयात लढावा," अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान आयुक्तांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले असून, या प्रकरणातील कायदेशीर बाबी तपासून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. या भेटीमुळे आता प्रशांत वाघमारे यांच्या समर्थनार्थ पुण्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून मोठी फळी उभी राहिली असल्याचे दिसून येत आहे.

Allegations against Prashant Waghmare are wrong : Supporter

शेअर करा