मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Akshay Shinde Encounter : बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेवर 3 राऊंड फायर, पोलिसांनी चकमकीची संपूर्ण कहाणी सांगितली

Akshay Shinde Encounter : आरोपी अक्षय शिंदे याला छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.

V
Vivek

2 मिनिट वाचन

Akshay Shinde Encounter : बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेवर 3 राऊंड फायर, पोलिसांनी चकमकीची संपूर्ण कहाणी सांगितली

Akshay Shinde Encounter : आरोपी अक्षय शिंदे याला छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मुंबईतील सर जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

ठाणे :- बदलापूर बलात्कार Badlapur Rape Case प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे Akshay Shinde Encounter याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. तेव्हापासून राज्यात राजकारण तापले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी ठाणे पोलिसांनी एसआयटी स्थापन केली असून ही एसआयटी डीसीपींच्या नेतृत्वाखाली तपास करणार आहे. आता या एन्काउंटरबाबत ठाणे पोलिसांनी Thane Police सर्व काही सांगितले आहे.

अधिकाऱ्याने सांगितले की, शाळेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या अक्षय शिंदेला सोमवारी दुसऱ्या एका गुन्ह्याच्या तपासानिमित्त तळोजा कारागृहातून बदलापूरला नेले जात असताना त्याने एका पोलीस सहाय्यक निरीक्षकांची रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केला. याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही गोळीबार केला.

ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात अनेक गुन्ह्यांसह पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात आलेला आरोपी अक्षय शिंदे तळोजा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. पोलीस अधिकारी आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे येथील पथक आरोपीला त्याच्या अटकेसाठी ट्रान्सफर वॉरंटसह तळोजा मध्यवर्ती कारागृहात घेऊन गेले.प्राथमिक माहितीनुसार, आरोपी शिंदे याला पोलीस पथकाने तळोजा मध्यवर्ती कारागृहातून सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले आणि सायंकाळी 6 च्या सुमारास त्याला ठाण्यात आणले जात होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी 6.15 च्या सुमारास पोलिसांचे वाहन मुंब्रा बायपासवर आले असता आरोपी अक्षय अण्णा शिंदे याने पथकातील पोलिस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे यांच्या कंबरेतून सर्व्हिस पिस्तूल काढले आणि पोलिस पथकाच्या दिशेने तीन राऊंड फायर केले, त्यापैकी एक सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला मार लागला असून आणखी दोन राऊंड फायर करण्यात आले आहेत.

पोलीस पथकाने तात्काळ जखमी पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि आरोपी अक्षय शिंदे यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात आणले, तेथे शिंदे यांना मृत घोषित करण्यात आले. अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे मुंबईतील सर जेजे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

हेही वाचा: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळीबार केला, स्वतःही जखमी

शेअर करा