मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ajit Pawar Plane Accident : अजितदादांच्या मृत्यूचे गूढ वाढले! राष्ट्रवादीच्या 20 आमदारांचा सुनेत्रा पवारांकडे 'धावा'; DGCA अहवालावर शंका व्यक्त करत CBI चौकशीची मागणी

Ajit Pawar Accident Latest News : देवगिरी निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत आमदारांची खलबतं | "आम्ही मुख्यमंत्र्यांची एकत्रित भेट घेऊ", सुनेत्रा पवारांचे आश्वासन | रोहित पवारांच्या दाव्यांमुळे पक्षात अस्वस्थता

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Lok Sabha Election News : महायुती त जागावाटपसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांनीच बलिदान द्यायचे का?

Ajit Pawar Accident Latest News : देवगिरी निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत आमदारांची खलबतं | "आम्ही मुख्यमंत्र्यांची एकत्रित भेट घेऊ", सुनेत्रा पवारांचे आश्वासन | रोहित पवारांच्या दाव्यांमुळे पक्षात अस्वस्थता

मुंबई :- दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्या अपघाती मृत्यूनंतर निर्माण झालेले संशयाचे धुके अद्याप निवळलेले नाही. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20 हून अधिक आमदारांनी काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख सुनेत्रा पवार यांची मुंबईतील 'देवगिरी' निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत आमदारांनी अजितदादांच्या अपघाताचा डीजीसीए (DGCA) अहवाल आणि सीबीआय (CBI) चौकशीत होत असलेला विलंब यावर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.

डीजीसीए अहवालावर आमदारांचा अविश्वास

अजित पवारांच्या अपघातानंतर महिन्याभराने समोर आलेल्या डीजीसीएच्या अहवालात अनेक त्रुटी असल्याचे आमदारांचे म्हणणे आहे. या अपघातामागे काही घातपात तर नाही ना, अशी शंका सातत्याने उपस्थित केली जात आहे. आमदारांनी सुनेत्रा पवार यांना विचारले की, "एवढी मागणी करूनही अद्याप सीबीआय चौकशी का सुरू झाली नाही?" तसेच, अपघातानंतर घटनास्थळी सापडलेल्या काही वस्तूही यावेळी आमदारांना दाखवण्यात आल्याचे समजते, ज्यामुळे आमदारांमधील अस्वस्थता अधिकच वाढली आहे.

सुनेत्रा पवारांची मध्यस्थी आणि आश्वासन

आमदारांच्या मनातील भीती आणि शंका लक्षात घेता, सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणात पुढाकार घेण्याचे मान्य केले आहे. "आपण सर्वजण एकत्रितपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ आणि त्यांच्यासमोर या सर्व शंका मांडू," असे आश्वासन त्यांनी आमदारांना दिले आहे. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळल्यापासून त्यांच्यावरील जबाबदारी वाढली असून, आता पतीच्या मृत्यूच्या तपासासाठी त्या स्वतः सरकारकडे पाठपुरावा करणार आहेत.

रोहित पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पक्षात अस्वस्थता?

दुसरीकडे, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या अपघातावरून रान उठवले आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट घेऊन या प्रकरणाची गुन्हेगारी अँगने (Criminal Angle) चौकशी करण्याची मागणी केली आहे. रोहित पवार ज्या आक्रमकतेने सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत, तसा प्रयत्न अजितदादांच्या स्वतःच्या पक्षातून का होत नाही, असा प्रश्न पक्षातील आमदारांना सतावत आहे. अमोल मिटकरी वगळता इतर वरिष्ठ नेते यावर मौन बाळगून असल्याने आमदारांमध्ये नाराजी आहे.

शेअर करा