मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

नवी मुंबईत एसीबीची कारवाई; सीडको अधिकारी आणि कंत्राटी कामगार ३० हजार लाच घेताना रंगेहात

नवी मुंबई, २६ ऑगस्ट : अॅन्टी करप्शन ब्युरो (ACB), नवी मुंबई यांनी आज मोठी कारवाई करताना सीडकोच्या क्षेत्रीय कार्यालयातील महिला अधिकारी आणि कंत्राटी कामगाराला ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

V
Vivek

1 मिनिट वाचन

नवी मुंबईत एसीबीची कारवाई; सीडको अधिकारी आणि कंत्राटी कामगार ३० हजार लाच घेताना रंगेहात

नवी मुंबई, २६ ऑगस्ट : अॅन्टी करप्शन ब्युरो (ACB), नवी मुंबई यांनी आज मोठी कारवाई करताना सीडकोच्या क्षेत्रीय कार्यालयातील महिला अधिकारी आणि कंत्राटी कामगाराला ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. Navi Mumbai Latest Crime News

जुईनगर (प.), सेक्टर २४ येथील सीडको प्लॉटवर गणपती आणि देवीच्या मूर्तींसाठी मंडप उभारण्यासाठी परवानगी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यासाठी ना हरकत दाखला (NOC) मिळवून देण्यासाठी सीडकोच्या क्षेत्रीय अधिकारी स्मिता प्रभाकर ठाकुर (वय ५३) आणि कंत्राटी कामगार योगेश अंबाजी कोळी (वय ३०) यांनी तक्रारदाराकडे ५०,००० रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर ही रक्कम ३०,००० रुपये ठरली.

तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनंतर ACB ने २५ ऑगस्ट रोजी मागणीची पडताळणी केली. त्यात दोन्ही आरोपींनी लाच मागणीची पुष्टी केली. त्यानंतर आज (२६ ऑगस्ट) दुपारी १२.४० वाजता सिडको कार्यालयाबाहेर, आरोपी योगेश कोळी हा तक्रारदाराकडून ३०,००० रुपयांची लाच स्वीकारताना पंचासमक्ष रंगेहात पकडला गेला. त्यानंतर अधिकारी स्मिता प्रभाकर ठाकुर यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

ACB पथकाने या दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या कारवाईत अॅन्टी करप्शन ब्युरो, नवी मुंबई पथकाने यश मिळवले.

शेअर करा