पुणे

MNS Leader Vasant More : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांचा राज ठाकरे यांना जय महाराष्ट्र

•अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा.. वसंत मोरे

पुणे :- पुणे शहरातील फायर ब्रँड नेते असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यचा राजीनामा दिला आहे. त्यांनी “अखेरचा जय महाराष्ट्र साहेब माफ करा”… असा संदेश देत राज ठाकरे यांच्या कार्यालयातील फोटोला नतमस्तक होत आहे. वसंत मोरे गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील पक्षश्रेष्ठीं विरुद्ध सातत्याने खदखद व्यक्त करताना दिसून आले आहे काल मध्यरात्री त्यांनी आपल्या फेसबुक भावनिक पोस्ट करत राजकीय चर्चांना उधाण आणल्या आहे. ते पक्ष सोडणार यावर शिक्का मोर्तब झाला असून त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून आपल्या राजीनामा कळविला आहे. MNS Leader Vasant More

वसंत मोरे यांनी आपल्या पत्रात काय म्हणाले?
प्रति.

मा. श्री राजसाहेब ठाकरे, सस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

विषयः माझा पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि सर्व पदांचा राजीनामा स्वीकारणे संदभर्भात,

आपणास सप्रेम जय महाराष्ट्र।

पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदावर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो. परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकान्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षापति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्यांना ताकद देतो त्या सहकाऱ्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून कोडी’ करण्याचे ‘तंत्र अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम विनंती. MNS Leader Vasant More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0