सामाजिक

Sanjay Gaikwad Beating Youth Video Viral : आमदार संजय गायकवाड यांचा तरुणाला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

•शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात

मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेनेचे बुलढाण्याच्या आमदार संजय गायकवाड यांचा तरुणांला मारहाण करणारा व्हिडिओ विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी वेट करत सवाल उपस्थित केले आहे. किती बोलायचे? किती प्रकरण रोज दाखवायचे? हीच का मोदींची गॅरंटी असे म्हणत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. Sanjay Gaikwad Beating Youth Video Viral

विजय वडेट्टीवार यांनी काय म्हणाले?

किती बोलायचं? …किती प्रकरणं रोज दाखवायची? ..या व्हिडिओत तरुणाला अमानुष मारहाण करणारा व्यक्ती हा काही मामुली गुंड नाही….मारहाण करणारा व्यक्ती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड….हवेत गोळीबार, एकमेकांवर गोळीबार, एकमेकांना लाथाभुक्क्या मारून सुरू असलेलं महायुतीच विकासच राजकारण आता जनतेला लाठ्या काठ्यानी झोडपून काढण्यापर्यंत पोहचलं आहे.असो… शेवटी हीच आहे मोदी की गॅरंटी! Sanjay Gaikwad Beating Youth Video Viral

बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड काही दिवसांपासून वादाच्या भौऱ्यात सातत्याने अडकलेले दिसत आहे, शिवजयंतीच्या निमित्त त्यांनी खास पोशाख परिधान केला त्यावेळी त्यांनी वाघाचे शिकार करून वाघाचा दात गळ्यात असल्याचे सांगितले त्यानंतर त्यांच्यावर तक्रारही झाली. तसेच दोन दिवसापूर्वी नागपूर मध्ये जमीन बळकवल्याचा आरोप करत एका महिलेने संजय गायकवाड बळकवल्याचा आरोप करत एका महिलेने संजय गायकवाड यांच्यासह पाच जणांना गुन्हा दाखल केला आहे अशा सातत्याने संजय गायकवाड यांच्या विरोधात काही प्रकरण बाहेर येत आहे. Sanjay Gaikwad Beating Youth Video Viral

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0